बुधवार १० जून २०२६

पाऊस सुरू :
प्रशासन अलर्ट मोडवर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पावसाळा सुरू झाल्याने स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर आले असून नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे अनेक उपाय प्रशासनामार्फत अवलंबले जात आहेत.
अतिवृष्टी झाल्यास जीवीत हानी व वित्तहानी कमीत कमी होईल यासाठी खबरदारी घेतली जात आहे. गतवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात तब्बल ६०१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांना नुकसान भरपाई पोटी ६५ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
खोतवाडी,वझरे, नावलकरवाडी,हरपवडे पेरणोली, हरपवडे येथे भूस्खलन होण्याची शक्यता गृहीत धरून विशेष कर्मचारी नेमण्यात आले आहेत. हिरण्यकेशी चित्रे व चिकोत्रा नदी काठावरील संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
पूरस्थिती निर्माण झाल्यास गजरगाव, कोवाडे, किटवडे, शेळप, देवकांडगाव, खेडे, मडिलगे, हारूर, साळगाव, वडकशिवाले, विनायकवाडी येथे प्राथमिक शाळांमध्ये निवारा केंद्रे तयार करण्यात येत आहेत.
एकंदर पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे.

आजऱ्यात पुन्हा पावसाची हजेरी
मान्सूनपूर्व की मान्सून ?
पेरणीची कामे वेगावली…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल मंगळवारी दुपारी पुन्हा एक वेळ पावसाने आजरा शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी जोरदार हजेरी लावली. सध्या समाधानकारक पाऊस सुरू असल्याने शेतकरी वर्ग शेती कामामध्ये गुंतलेला दिसत आहे. आजऱ्यासह आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये वारंवार पाऊस हजेरी लावत आहे. असे असताना शासनाच्या कृषी विभागाकडून पेरणीची गडबड करू नये असे सांगितले जात आहे. यामुळे सध्या होत असलेला पाऊस हा मान्सूनपूर्व की मान्सून याबाबत मात्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तरीदेखील शेतकरी वर्ग पेरणीची कामे आटोपून घेताना दिसत आहे.

उत्तूर येथे पाणंद रस्त्याचा शुभारंभ.
‘मनरेगा’अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने १ किमी रस्त्याचे काम सुरू

उतूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर मधील वडाचा मार्ग येथील ओढ्यापासून ते सोलर प्लांटपर्यंतच्या एक किलोमीटर अंतराच्या पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते करण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) ग्रामपंचायतीच्या वतीने १० लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य राजू खोराटे, सुवर्णा नाईक, अनिता घोडके, आशा पाटील, लता गुरव, सविता सावंत, ग्रामरोजगार सेवक दादू सावंत, बाळकू चव्हाण, विष्णू चव्हाण, आप्पा इंगळे, बाळू इंगळे, निवृत्ती फाळके, महमद लाटवाले, तानाजी कुंभार, श्रीराम घोरपडे, भाऊ बोरवडकर, संजय हतिरगे, नितीन येजरे आदि शेतकरी वर्ग व ठेकेदार ज्ञानेश्वर आरेकर उपस्थित होते.
आभार उपसरपंच सुनिता हतिरगे यांनी मानले.

खंडित वीज पुरवठ्यापासून आजरेकरांची सुटका…
मलिग्रे येथून ३३ केव्ही लाईन कार्यान्वित

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वारंवार मुम्मेवाडी येथून ३३ टीव्ही लाईनचा वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले होते. यामुळे शेतकरी वर्गासह व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पर्यायी बारा वर्षांपूर्वी प्रयत्न करण्यात आलेली व सध्या अपूर्ण अवस्थेत असणारी मलिग्रे आजरा ३३ केव्ही वीज वाहिनी कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या विशेष प्रयत्नातून पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे.
या नवीन वाहिनीमुळे मुम्मेवाडी येथून वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने पर्यायी वीज पुरवठा करण्यात येणार आहे.
यामुळे आता आजरा तालुकावासियांसह परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

आरोग्य शिबीर उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संत गजानन रूरल रुग्णालय व आरोग्य उपकेंद्र दाभिल यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरास पंचायत समिती उपसभापती सौ. यशोदा पोवार, जनआरोग्य समिती सदस्य श्री. देवदास बोलके, दाभिलचे सरपंच श्री. युवराज पाटील, डॉ. सौरभ चव्हाण, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका तसेच संत गजानन महाराज रूरल रुग्णालयाचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

छत्रपती युवा ग्रुप, उत्तूर यांचेमार्फत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राजमाता जिजाऊ फाउंडेशन संचलित श्री छत्रपती युवा ग्रुप उत्तूर यांचे मार्फत शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रुपचे २१ मावळे सहभागी होते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्याभिषेक दिना निमित्त गडकिल्ले मोहीम संपन्न झाली यामध्ये तुंग किल्ले तिकोना पालीचा गणपती, किल्ले सुधागड व किल्ले रायगड, किल्ले प्रतापगड या गडांचा मोहिमेमध्ये समावेश होता.
या मोहिमेचे नियोजन संदीप चव्हाण व विद्याधर ढोनुक्षे यांनी केले होते. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष योगेश भाईगडे, प्रथमेश पाटील, समर्थ गुरव, ज्योतिरादित्य धुरे , वैभव भाईगडे, शुभम तिबिले , प्रथमेश भाईगडे , साहिल जवाहिरे , विश्वनाथ हसबे , दिगंबर कुंभार, प्रवीण अमनगी , राजू कापसे, पृथ्वीराज रेडेकर, सुयोग पारपोलकर , आदित्य जवाहिरे सहभागी झाले होते.
छाया वृत्त

उत्तूर मधील ख्रिस्ती समाजाच्या स्मशान भूमीच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे उदघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. वसंतराव धुरे , जि.प.सदस्य श्री. शिरीष देसाई, सरपंच श्री. किरण आमणगी, पं.स. सदस्य श्री विकास चोथे, सौ. हतरगी, श्री. विजय गुरव, सौ. समिक्षा देसाई, सौ. सरिता कुरुणकर, श्री. पोपट बारदेस्कर,श्री. विल्यम रॉड्रिक्स, श्री. शाहू बारदेस्कर, श्री. कैतान बारदेस्कर,श्री. अनिकेत फुडतात यांच्यासह उत्तूर मधील ख्रिस्ती बांधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

आजचे पंचांग
दिनांक : १० जून २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : दशमी ( ११ जून रात्री १२.५७ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा नक्षत्र (सकाळी ०९.२१ पर्यंत) त्यानंतर रेवती नक्षत्र
योग : आयुष्मान योग (सकाळी ०६.२९ पर्यंत) त्यानंतर सौभाग्य योग
करण : वाणीजा करण (दुपारी ०१.५२ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : मीन राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.३८ ते दुपारी ०२.१७ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
मडीलगे येथे मैत्री फाऊंडेशनचे आज उद्घाटन

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा व वृक्ष संवर्धन या क्षेत्रात विधायक दृष्टिकोन ठेवून सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने मडिलगे ता. आजरा येथे मैत्री फाउंडेशन ची स्थापना होत असून आज बुधवार दिनांक १० जून रोजी सकाळी ८.०० वाजता पंचायत समितीचे माजी सभापती व भावेश्वरी संस्था समुहाचे अध्यक्ष भिकाजी गुरव यांच्या हस्ते व हनुमान संस्था समूहाचे अध्यक्ष के. व्ही. येसणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.


