mrityunjaymahanews
अन्य

Breaking News

.

देवदर्शनाहून परतताना झाला अपघात…

महिला ठार तिघे जखमी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     शिर्डी – अक्कलकोट येथून देवदर्शन करून गोव्याच्या दिशेने परतणाऱ्या चार चाकीला आजरा – आंबोली मार्गावर सुळेरान ता. आजरा येथे अपघात होऊन चारचाकी पलटी झाल्याने गाडीतील सौ. अंकिता अजित भोसले (वय ५० वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला तर अजित हरिश्चंद्र भोसले (वय ५६ वर्षे, धंदा- इलेक्ट्रिशियन) आशिष अजित भोसले (वय २९ वर्षे) व अंकेश अजित भोसले (वय ३१ वर्षे) हे तिघेजण जखमी आहेत. सर्वजण म्हापसा/ गोवा येथील आहेत.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी

    अक्कलकोट, शिर्डी, देवदर्शनासाठी बुधवारी दुपारी म्हापसा, गोवा येथील भोसले कुटुंबीय आपल्या (मारुती स्विफ्ट जी. ए. ०५  डी १८७५ ) चारचाकीतून निघाले होते. गुरुवारी त्यांनी देवदर्शन घेतल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते परतीच्या प्रवासाला लागले. प्रवासादरम्यान जेवण करून ते गोव्याच्या दिशेने जात असताना आज शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुळेरान येथील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी शेजारील जाहीरात फलकाला थडकून पलटी झाली. यामध्ये सौ. अंकिता यांचा जागीच मृत्यू झाला तर पती अजित व आशिष आणि लंकेश ही दोन मुले जखमी झाली.

     जखमींवर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. आजरा पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

‘ S ‘ वळण ठरले धोकादायक

      अपघात स्थळावरील ‘ S ‘ वळण हे धोकादायक असून यापूर्वीही येथे अपघात झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांकडून सदर वळण काढण्याबाबतचे लेखी निवेदन वरिष्ठांकडे देऊनही याकडे फारसे गांभीर्याने न पाहिल्याने पुन्हा एक वेळ आज भोसले कुटुंबीयांना अपघाताला सामोरे जावे लागले अशी चर्चा घटनास्थळी होती.

 

संबंधित पोस्ट

चित्री प्रकल्प १००% भरला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

काय आहे 5G नेटवर्क… सिम कार्ड, स्पीड आणि किंमत याबाबत संपूर्ण माहिती…

mrityunjay mahanews

एसटी चालकाला मारहाणप्रकरणी सातजणांविरोधात गुन्हा नोंद…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!