mrityunjaymahanews
अन्य

एक किलो १०० ग्रॅम गांजासह एक जण पोलिसांच्या ताब्यात

मंगळवार दि.११ फेब्रुवारी २०२५

१ किलो १०० ग्रॅम गांजासह आजरा येथील एक जण पोलिसांच्या ताब्यात

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार समीर कांबळे व योगेश गोसावी यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळालेल्या माहितीवरून आजरा पोलीस ठाणे हददीमध्ये भादवण येथील जुन्या बस स्टॉपजवळ मासेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती गांजा या अंमली पदार्थाची अवैध विक्री करण्याकरीता येणार असलेची खात्रीशीर बातमी मिळाली . त्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री करून सापळा लावुन मंगळवार दिनांक ११ रोजी रोजी छापा टाकला असता लुकमान अस्लम लमतुरे (वय २८ वर्षे, रा नाईक गल्ली, आजरा ता आजरा, जिल्हा कोल्हापूर ) याचे ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला.

        बेकायदेशिररित्या विक्रीकरिता आणलेल्या या गांजाचे वजन एकूण १ किलो १०० ग्रॅम असून गांजा व इतर साहित्य असा एकूण २६४००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. लमतुरे याच्या विरुध्द आजरा पोलीस ठाणेस एनडीपीएस कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

       पो.हे.कॉ. समीर संभाजी कांबळे यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे.

आजरेकर सुखावले…

गांजा विरोधातील पोलिसांच्या धडक कारवाईमुळे आजरा तालुकावासीय सुखावले असून पोलिसांच्या या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

(बातमीत वापरलेले छायाचित्र प्राथमिक स्वरूपातील आहे.)

वन्यप्राणी शिकार प्रकरणी चंदगड येथे दोघांविरोधात गुन्हा दाखल...

 चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      चंदगड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वनपरिमंडळ चंदगड येथील मौ. चंदगड जंगल कक्ष क्र. ३ मध्ये वनपाल चंदगड श्री. कृष्णा डेळेकर, वनरक्षक श्री. सागर कोळी व श्री. आकाश मानवतकर, वनसेवक श्री. नितीन नाईक, व वन्यजीव बचाव पथकातील सदस्य हे पायी फिरती (गस्त) करत असताना सायंकाळी पाचच्या दरम्यान अनोळखी दोन इसम शिकारीचे हेतूने बक-याचे चारट (चरबी) लावलेले स्फोटक गोळे जंगलक्षेत्रातील जाणाऱ्या पायवाटेवर ठिकठिकाणी वेग-वेगळया दिशेने ठेवत असताना दिसुन आल्याने वनपरिक्षेत्र चंदगड कडील अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत सदर ठिकाणची तपासणी केली असता शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना दिसुन आले.

       अधिक तपासणी केली असता आरोपीं कडुन ठेवलेले व त्यांचेकडील एकुण स्फोटक गोळे नग संख्या-१००, निळ्या रंगाची कापडी पिशवी १ नग, निळ्या रंगाची प्लॅस्टिक पिशवी २ मोबाईल , मोटार सायकल इत्यादी मुद्देमाल जागेवर जप्त करणेत आला आहे.

     जेमीनी मंजु रजपुत (रा. हक्किपक्की कॅम्प, होसुडी, सदाशिवपुरा ता.जि.शिमोगा,कर्नाटक) व मंजुनाथ धरम रजपुत ( रा. हक्किपक्की कॅम्प, होसुडी, सदाशिवपुरा ता.जि. शिमोगा कर्नाटक) यांचे विरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायद्यानुसार वनगुन्हा नोंद करुन आरोपींना अटक करुन त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चंदगड यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

 

संबंधित पोस्ट

आज-यात आज माजी सैनिक पतसंस्थेचा रौप्य महोत्सव …. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित…भारतीय जनता पार्टी आजरा युवा मोर्चा  मार्फत  रक्तदान शिबिर उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

निवडणूक विशेष आजरा परिवर्तन विकास आघाडी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!