mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


 

अन्वी ठरली जगातील सर्वात लहान गिर्यारोहक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी अनिता चेतन घाटगे वय ४ वर्ष ८ महिने हिने ७ एप्रिल २०२४ रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सह्याद्री पर्वत रांगेतील व केरळ राज्यातील सर्वोच्च शिखर मिसापल्लीमला ( समुद्रसपाटीपासून ८,६६२ फुट उंच) हे अवघ्या दीड तासात सर करून हे शिखर सर करणारी जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे .

     पोलीस दलातील कर्मचारी असणाऱ्या चेतन घाटगे यांची कन्या अन्वी हिने दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी मराठी नवीन वर्षानिमित्त तमिळनाडू राज्यातील सर्वोच्च शिखर दोडाबेटा ( समुद्रसपाटीपासून ८,६५२ फूट उंच) हे शिखर अवघ्या ५० मिनिटांमध्ये सर करून हे शिखर सर करणारे जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरले आहे.

      तसेच तिने या मोहिमेदरम्यान दक्षिण भारतातील आठ किल्ले सर केले आहेत.

शहरवासीयांनो घरफाळा भरा…
अन्याय निवारण समितीचे आवाहन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शहरवासीयांनी जुन्या आकारणीने घरफाळा व पाणीपट्टी नगरपंचायतीकडे जमा करून सहकार्य करावे असे आवाहन अन्याय निवारण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

     करवाढीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीकडून सुधारित वाढीव घरफाळा व पाणीपट्टीबाबत नोटिसा लागू केल्या होत्या. सदर नोटीसा काढल्यानंतर जनतेतून प्रचंड संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.अखेर अन्याय निवारण समितीने ४ डिसेंबर २०२३ रोजी नगरपंचायतीवर विराट मोर्चा काढून करवाढीस विरोध दर्शविला होता. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी वाढीव घरफाळा नोटीसा मागे घेत असल्याची जाहीर करून नूतन सदस्यांची नियुक्ती होईपर्यंत जुन्या पद्धतीने घरफाळा व पाणीपट्टी जमा करून नगरपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन केले होते. परंतु अद्यापही बऱ्याच शहरवासीयांनी घर फाळा व पाणीपट्टी जमा केलेली नाही. शहरवासीयांनी तातडीने जुन्या पद्धतीनेच ही पाणीपट्टी व घरफाळा भरून नगरपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

      यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष सुधीर कुंभार, सचिव विजय थोरवत, पांडुरंग सावरतकर, गौरव देशपांडे, राजू विभुते उपस्थित होते.

आज पासून बोरीवली व परेल मार्गावर हिरकणी धावणार…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    आजरा आगारा मार्फत उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर परेल व बोरिवली मार्गावर शनिवार दिनांक १३ एप्रिल पासून विशेष बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. परेलच्या दिशेने आजरा बस स्थानकावरून सायंकाळी ६.३० वाजता बस निघणार आहे . तर परेल येथून आज-याच्या दिशेने सायंकाळी सात वाजता बस सुटणार आहे. बोरीवली करता आजरा बस स्थानकातून दुपारी ४.३० वाजता तर बोरिवली बस स्थानकातून आज-याच्या दिशेने सायंकाळी चार वाजता बस फेरी सुरू राहील.

       प्रवाशांच्या मागणीवरून हिरकणी बस सेवा सुरू करण्यात आली असून एसटी महामंडळाच्या सर्व सवलती या विशेष बस फेऱ्यांना लागू करण्यात आल्या असल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

रविवारी आजरा येथे श्री रवळनाथ प्रकट दिन सोहळा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा येथे रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी श्री रवळनाथ प्रकट दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त पहाटे साडेपाच वाजता अभिषेक व पादुका पूजन करण्यात येणार असून सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी श्री रवळनाथ प्रकट सोहळा होणार आहे. सायंकाळी स.७ ते ७.३० या कालावधीत श्री केदार कवच पठण व त्यानंतर महाआरती व प्रसादाचे वाटप होणार आहे. हे सर्व कार्यक्रम रवळनाथ मंदिर, आजरा येथे होणार आहेत.

छाया वृत्त

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा येथील आमदार पाटील प्रेमी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक अभिषेक शिंपी, किरण कांबळे, सचिन शिंपी, अमित खेडेकर, विलास पाटील, विक्रम पटेकर, विश्वास जाधव आदी उपस्थित होते.

निधन वार्ता
बंडू शिंदे

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वडकशीवाले ता. आजरा येथील बंडू दत्तू शिंदे (वय ६७ वर्षे) यांचे हृदयविकाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

     रक्षाविसर्जन रविवारी सकाळी नऊ वाजता वडकशिवाले येथे आहे.


 

संबंधित पोस्ट

प्रा. संजय मंडलिक हेच योग्य उमेदवार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!