mrityunjaymahanews
अन्य

जयवंत येळेकर/कुंभार यांचे निधन…

 

जयवंत येळेकर यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आज शुक्रवारी पहाटे आजरा येथील मूर्तीकार जयवंत महादेव येळेकर (कुंभार) यांचे आकस्मिक निधन झाले. निधन समय त्यांचे वय ६५ वर्षे होते.

येळेकर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी सून, जावई, नातवंडे व दोन भाऊ असा परिवार आहे.

अंत्यविधी सकाळी ९ वा. आजरा येथील कुंभार समाजाच्या स्मशानभूमीत होणार आहेत.

येळेकर हे उत्कृष्ट मूर्तिकार व टेलर म्हणून आजरा तालुक्यात प्रसिद्ध होते.


तर यापुढे मतदान नाही

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आंबेओहोळ धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा झाला असताना देखील पुनर्वसन पूर्ण झालेली नाही.अद्याप एकही गुंठा जमीन न मिळालेले १०० शेतकरी व अर्ध पुनर्वसन झालेले ५० शेतकरी तर भूखंड न मिळालेले ३० हून अधिक शेतकरी पुनर्वसनापासून वंचित आहेत या पार्श्वभूमीवर येथून पुढील निवडणुकांमध्ये मतदानावर आंबओहोळ प्रकल्पग्रस्त बहिष्कार घालत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

        संकलन दुरुस्ती न झालेले काही शेतकरी आहेत म्हणजे २०० च्या वर पुनर्वसन बाकी असणारे स्वतंत्र कुटुंब संख्या धरल्यास २५० च्या वर पुनर्वसनापासून कुटुंबे वंचित आहेत असे असताना कोणीही लोकप्रतिनिधी पुनर्वसनाकडे गांभीर्याने पहात नाहीत अगर ज्यांच्यावर पुनर्वसनाची जबाबदारी दिली आहे. ते अधिकारी देखील धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे गेली २३ वर्ष पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असणारे शेतकरी धरणग्रस्त पूर्णपणे निराश झाले आहेत.

      आमची एक पिढी गेली आता तरी पुनर्वसन करावे नाहीतर शेतक-यांनी जगायचे तरी कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुनर्वसनाची बैठक होत नसेल व शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही येथून पुढे कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करणार नाही. असा सामूहिक निर्णय बैठकीत घेण्यात आला. लोकशाही पद्धतीने मतदान करण्याचा आमचा हक्क आहे परंतु आमचा नाईलाज झाला असून हा निर्णय आम्ही नाईलाजाने घेत असल्याचे याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे.

       निवेदनावर आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

रस्त्याच्या विलंबामुळे काजू पिकाचे नुकसान…
उपोषणाचा इशारा

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       डॉ. धनाजी गोविंद राणे रा. वेळवट्टी ता आजरा यांच्या काजू बागेतील काजू झाडांवर बांदा ते संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग बांधकाम सुरू असल्याने रस्त्यावरील लाल माती व धुळ पडल्याने धुळीमुळे झाडांच्या पानांमधून प्रकाश संश्लेशण क्रिया या वर्षी काजू बी व काजू बोंड आकुंचन पावल्यामुळे काजू बी एकदम लहान धरली असून उत्पादन बरेच घटले आहे. महामार्गाच्या कामात होणारी दिरंगाई याला कारणीभूत असून काम त्वरित न झाल्यास उपोषणाचा इशारा डॉ. राणे यांनी दिला आहे.

       वास्तविक पाहता आजरा ते आंबोली महामार्ग करताना अगोदर पुल व मोरी बांधकाम केल्या नंतरच रस्ता खुदाई करणे योग्य व व्यावहारिक होते परंतु रस्ता खुदाई माहे आक्टोबर २०२३ मध्येच आजपर्यंत नुसता उकरून ठेवला आहे यामुळेच काजूचे नुकसान झाले आहे .याच धुळीमुळे  पशुखाद्य व राईस शाॅपी दुकान गेली सहा महिने बंदच आहे.

आपल्यासारख्या शासकीय सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकांला रस्ते विकास खात्याने आरोग्य दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या त्रास दिला आहे.यासाठी काजू बीची नुकसान भरपाई द्यावी व रस्ता ताबडतोब पुर्ण करावा न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा डॉ.राणे यांनी दिला आहे.

जनता बँकला ९ कोटी ३० लाखाचा ढोबळ नफा

अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांची माहीती

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       येथील जनता सहकारी बँकेला सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात रु ९ कोटी ३० लाखांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहीती अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.
बँकेकडे मार्च २०२४ अखेर रु ३३ कोटी स्वभांडवल असून रु ३५७ कोटीच्या ठेवी आहेत. तसेच रु २३१ कोटीची कर्जे व रु १५३ कोटीची गुंतवणूक आहे. बँकेचा ग्रॉस एन पी ए ३.७१ टक्के असून नेट एन. पी. ए.शुन्य टक्के आहे. तसेच बँकेचा सी आर ए आर १४.९६ टक्के असून बँकेने रिझर्व बँकेचे सर्व निकषांचे तंतोतंत पालन केले आहे. त्यामुळे या ही वर्षी बँकेने रिझर्व बँकेच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापन (FSWM) क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे. असे बँकेचे अध्यक्ष देसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी एम.बी. पाटील यांनी सांगितले.

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप मध्ये व्यंकटरावचे यश


       आजरा:मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा येथील व्यंकटराव
हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील इ. ५ वी व इ.७ वी या इयत्तांतील विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत (बी.डी.एस.) चांगले यश संपादन केले. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी…

१) काव्या विनायक गावडे इयत्ता पाचवी (ब्राँझ मेडल)

२) विवेक धनाजी पाटील इयत्ता सातवी (गोल्ड मेडल)

३) सौश्रुती अमित पुंडपळ इयत्ता सातवी (गोल्ड मेडल)

४) विभावरी विक्रम जावळे इयत्ता सातवी (गोल्ड मेडल)

५) संस्कृती धनाजी इलगे इयत्ता सातवी (सिल्वर मेडल)

    वरील सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.


निधन वार्ता
प्रा. सुभाष सूर्यवंशी


       आजरा महाविद्यालय मधील ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य प्रा.सुभाष शामराव सूर्यवंशी (वय ६९ वर्षे ) यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कुडाळनजीक दुचाकी अपघातात कानोली येथील तरुण ठार… एक जखमी

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!