mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


एका अल्पवयीन मुलीचे अपहरण तर एक विवाहिता बेपत्ता

                     आजरा: प्रतिनिधी

        आजरा तालुक्यातील यमेकोंड येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाले असल्याची तर पवारवाडी/हाळोली येथून वझरे येथील सौ.सोनाली कृष्णा पाटील ही २६ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाली असल्याच्या घटना घडल्या आहेत.

        यमेकोंड येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची वर्दी मुलीच्या वडिलांनी तर हाळोली येथील विवाहितेची बेपत्ता होण्याची वर्दी सुनील पांडुरंग पोवार आजरा पोलिसांत दिली गेली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे पुढील तपास करीत आहेत.


केसपेपर ची वेळ वाढवा…
शिवसेना युवासेनेची मागणी

                    आजरा: प्रतिनिधी

     ‘  मृत्युंजय ‘ कार शिवाजीराव सावंत आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये केसपेपर काढण्याची वेळ सध्या दु.१२:३० वाजेपर्यंत आहे. मुख्य शहरापासून ग्रामीण रुग्णालय लांब असल्याने व वाहनांच्या गैरसोयींमुळे त्यानंतर येणाऱ्या रुग्णांची केस पेपर काढताना अडचण होत असल्यामुळे आजरा तालुका शिवसेना वतीने केस पेपर ची वेळ ही दु. २:०० वाजेपर्यंत करावी अशा मागणीचे निवेदन ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले आहे.

       यावेळी शिवसेना उपशहर प्रमूख समीर चांद, युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, युवासेना शहर प्रमूख रोहन गिरी, राजू पाटील, सिध्दार्थ हसबे, रवी भाटी व इतर कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.


उत्तूर येथील संयुक्त शिवजयंती सोहळा आजपासून सुरु…
भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

                    उत्तूर:प्रतिनिधी

       श्री छत्रपती युवा ग्रुप, उत्तूर आयोजित संयुक्त शिवजयंती सोहळा आज शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. आठवडाभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

      शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान दररोज पहाटे साडेपाच वाजता काकड आरती होणार आहे. तर शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पशुवैद्यकीय दवाखाना उत्तूर येथे मोफत जनावरांचे आरोग्य शिबीर होणार असून रात्री नऊ वाजता सुभेदार (गड आला पण सिंह गेला) या चित्रपटाचे आयोजन केले आहे.शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता ‘ होम मिनिस्टर ‘ हा कार्यक्रम होणार असून यातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना मानाची पैठणी व तिजोरी, ड्रेसिंग टेबल, गॅस शेगडी व उपविजेत्या १७ महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत विशाल पाटील हे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

       रविवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता पारंपारिक वेशभूषा भव्य मोटरसायकल रॅली व मोटरसायकल सजावट स्पर्धा होणार आहेत तर तीन वाजता किल्ले वल्लभगड येथून शिवज्योत आणण्यासाठी प्रस्थान करण्यात येणार आहे. सायंकाळी आठ वाजता स्वामी समर्थ कॉलनी येथे शिवज्योत आगमन श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेच्या पालखी सोहळा व रात्री नऊ वाजता पाच नद्यांच्या पाण्याची मिरवणूक व ध्वजारोहण व तोरण बांधण्याचा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी दुपारी तीन वाजता रांगोळी स्पर्धा तर पाच वाजता लहान मुलांच्यासाठी फनी गेम्स चा कार्यक्रम होणार आहे.

      सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना महा अभिषेक व काकड आरती पहाटे पाच वाजता तर सकाळी दहा वाजता महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आणि सायंकाळी चार वाजता मिरवणूक समारंभ होणार आहे.

      मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता शालेय मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम व त्यानंतर रात्री नऊ वाजता भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


मडिलगे येथील श्रीराम दूध संस्थेच्या अध्यक्षपदी दीपक देसाई

                    आजरा : प्रतिनिधी

       मडिलगे येथील श्रीराम दूध सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी आजरा साखर कारखाना संचालक व माजी सरपंच दिपक देसाई यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी भावेश्वरी संस्था समूहाचे प्रमूख माजी सभापती भिकाजी गुरव होते.

       राजाराम येसणे यांनी अध्यक्षपदासाठी देसाई यांचे नाव सूचविले त्यास संजय घंटे यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर सभासद व संचालक मंडळ यांनी देसाई यांचा सत्कार केला. यावेळी देसाई यांनी पारदर्शक कारभारातून दूध उत्पादकांना फायदा करून देणार असून दूध वाढीसाठीही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

      ज्ञयावेळी सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.


गवसे हायस्कूल येथे ‘करीयरच्या वाटा ‘ यावर कार्यशाळा

                    आजरा: प्रतिनिधी

       बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल, गवसे येथे ‘करीयरच्या वाटा’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक चंद्रकांत घुणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून माजी नौदल अधिकारी सतीश नेवरेकर उपस्थित होते.

      विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शालेय जीवनात कसा अभ्यास करावा व आपली ध्येये कशी साध्य करावीत यासाठी कोणकोणती क्षेत्र आहेत यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या धेयासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली.

       सदर कार्यक्रमास रणजित सावंत,लिपिक संदीप वाटवे, विवियन मस्कारनेस, गर्जना प्रतिष्ठानचे सुयश लाड व त्यांचे सहकारी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कालेकर यांनी केले तर आभार सचिन देशमुख यांनी मानले.


छायावृत्त…


उत्तुर ता. आजरा येथे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आजरा पोलिसांनी संचलन केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!