
पं. स.सदस्य बशीर खेडेकर यांचे निधन

आजरा : प्रतिनिधी
आजरा पंचायत समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री.बशीर आदम खेडेकर यांचे अल्पश: आजाराने सोमवारी रात्री निधन झाले.निधनसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते.
महिनाभरापूर्वी खेडेकर यांना हृदय विकाराचा त्रास सुरू झाल्याने कोल्हापूर येथे उपचार सुरू होते त्यानंतर त्यांना मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर पुन्हा ते राजकारणात सक्रिय झाले होते.कालच त्यांनी श्री चाळोबा देव विकास आघाडीच्या पत्रकार बैठकीला हजेरी लावली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते गत पंचायत समिती निवडणुकीत आजरा मतदारसंघातून निवडून आले होते.माजी सरपंच स्व. असलम खेडेकर व स्व.अप्पासाहेब खेडेकर यांचे ते बंधू होत. जयवंतराव शिंपी यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,मुलगी,
सूना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.


सभा आणि पत्रकार बैठकांमधील आरोप आणि प्रत्यारोप…

श्री चाळोबादेव विकास आघाडी प्रमुख…
✔️राष्ट्रवादीच्या प्रमुख मंडळीकडून कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी आणलेला दबाव हे म्हणणे म्हणजे केवळ बनाव…
✔️ मुकुंदराव देसाई यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी सुधीर देसाई यांनी निवडणूक लादली…
… अभिषेक शिंपी
✔️ नेहमी कोलांट्या उड्या मारणारे विष्णुपंत केसरकर म्हणजे एक विषाणू….
✔️ कधीही सभेला हजर न राहणाऱ्या व भागातील ऊस आजरा कारखान्याला आणण्यात अपयशी ठरलेल्या वसंतराव घुरे यांना मावळत्या सभागृहात चेअरमन होता आले नाही त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आम्ही ‘ पनौती ‘
….अशोकअण्णा चराटी
✔️ बंद कारखाना सुरू करण्यासाठी एक रुपयाचेही दायित्व न स्विकारणा-या मंडळींनी बेछुट आरोप थांबवावेत…
…..मलिककुमार बुरुड



श्री रवळनाथ विकास आघाडी
✔️ वार्षिक सभेसमोर कारखानाचा ताळेबंद चुकीचा आहे म्हणणा-यांनी प्रचार सभेसमोर भाषणे करताना आपल्या अज्ञानामुळे तो चुकीचा वाटला असे जाहीर करावे…
✔️ २०१८ साली प्रॉव्हीडंट फंड न भरल्याने कारखान्याला दिड कोटी रुपये दंडाला सामोरे जावे लागत आहे याला जबाबदार कोण ?…
…सुधिर देसाई
निवडणुका झाल्यावर साखर वाटप करतो म्हणणारे दिवाळीत साखर वाटप का करू शकले नाहीत ?…
✔️ कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याशिवाय पर्याय नाही…
… दिगंबर देसाई
✔️ बांगड्यांचा आहेर देणाऱ्या श्रीमती रेडेकर यांचा प्रचार करण्याची नामुष्की जयवंतराव शिंपी यांच्यावर आली आहे…
✔️ कर्नाटकातून ऊस आणून शिंत्रे-रेडेकर यांनी वाहतूक खर्च वाढवला असे म्हणणाऱ्या अशोक चराटी त्यांच्याकरीता मते मागत फिरत आहेत.
… विष्णुपंत केसरकर


संजय महल्ले यांच्या ‘तिचं काय चुकलं ? ‘ या कादंबरीस ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार

आजरा:प्रतिनिधी
आजरा येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या श्रीमंत गंगामाई बाचन मंदिरामार्फत सन २०२२ सालाकरीताचा ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार
संजय महल्ले (अमरावती) यांच्या ‘तिचं काय चुकलं’ या कादंबरीस जाहीर झाला आहे.
सुनील जाधव पालघर यांच्या ‘मी आहे’ या कथासंग्रहास कै दाजी टोपले कथासंग्रह पुरस्कार, डॉ. गोपाळ गावडे (चंदगड) यांच्या ‘उंबळट’ या साहित्यकृतीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय गद्यसाहित्य पुरस्कार, डॉ. वसुधा वैद्य (नागपूर) यांच्या ‘गम्माडी गंमत’ या बालकाव्यसंग्रहास बालसाहित्य पुरस्कार तर शशिकांत हिंगोणेकर (जळगाव) यांच्या ‘युध्दरत’ या काव्यसंग्रहास मैत्र काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. याचबरोबर भूमिपुत्र साहित्यिक गौरव पुरस्कार डॉ. शिवशंकर उपासे (आजरा) व माता गौरव पुरस्कार श्रीमती शोभा प्रकाश जाधव (खानापूर) यांना जाहीर करण्यात आला.
उत्कृष्ट ग्रंथालयांसाठी देण्यात येणारे कै. काशिनाथअण्णा चराटी उत्कृष्ट ‘अ’ वर्ग ग्रंथालय पुस्कार – शारदा वाचन मंदिर वारणानगर, ता. पन्हाळा, कै. माधवरावजी देशपांडे उत्कृष्ट ‘ब’ वर्ग ग्रंथालय पुस्कार – सर्वोदय वाचनालय, चंदगड तर कै. बळीरामजी देसाई उत्कृष्ट ‘क’ वर्ग ग्रंथालय पुस्कार – अक्षय सार्वजनिक वाचनालय चाफवडे ता. आजरा यांना जाहीर करणेत आला आहे.
तर उत्कृष्ट वाचक पुरस्कारासाठी कु. आदिती अभिजीत भातकांडे बालवाचक, श्री अनिल विश्राम होलम अभ्यासिका वाचक, श्रीमती जया जगदीश आपटे – महिला वाचक तर श्री. भीमराव बापू पुंडपळ-पुरूष वाचक यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारांचे वितरण शनिवार दिनांक २३ डिसेंबर, २०२३ रोजी आजरा येथे समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर, उपाध्यक्षा गीता पोतदार, व सहकार्यवाह विनायक आमणगी यांनी सांगितले.

संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी नागपूर अधिवेशनाला आंदोलनासाठी रवाना

आजरा: प्रतिनिधी
नागपूर येथे दिनांक १३ रोजी महाराष्ट्र राज्य महामार्ग बाधित महासमिती* मार्फत आंदोलन केले जाणार आहे. राज्यस्तरावरील महा समितीमध्ये संकेश्वर – बांधा शेतकरी संघटना एकत्रित काम करत असून या राज्यव्यापी लढ्यामध्ये सामील होण्यासाठी शेतकरी व कार्यकर्ते रेल्वेने नागपूरला रवाना झाले आहेत.
नागपूरला या आंदोलनाला रवाना होण्यापूर्वी संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची शिष्टमंडळाने मडिलगे येथे भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्याच पद्धतीचे निवेदन मुख्यमंत्री यांना नागपूरच्या अधिवेशन काळात देण्यात येणार आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान मा. मुश्रीफ यांनी संघटना प्रतिनिधी व कार्यकर्ते यांना अधिवेशन झाल्यानंतर प्रांताधिकारी व महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार कंपनी यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे अध्यक्ष व राज्य संघटनेचे निमंत्रक काँम्रेड. शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे गणपतराव येसणे, दिगंबर होरंबळे, अण्णासो पाटील, अनिल शिंदे, सागर भाटले, शिवाजी डोंगरे, हरिराम चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

निधन वार्ता
गीता नार्वेकर

आजरा येथील गीता सुभाष नार्वेकर (कोठावळे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.




