mrityunjaymahanews
अन्य

चांदेवाडी येथे मारामारी… सात जणांविरोधात गुन्हा नोंद

चांदेवाडी येथे मारामारी..
सात जणाविरोधात गुन्हा नोंद


चांदेवाडी ता. आजरा येथे हसबे कुटुंबीयात झालेल्या मारामारी प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की ..

गौतम अशोक हसबे व आशुतोष शिवाजी हसबे यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचा वाद आहे.या वादाचे पर्यवसान सोमवारी सकाळी मारामारीत झाले. काठ्या व लोखंडी रॉडच्या साहाय्याने झालेल्या या मारामारीत गौतम अशोक हसबे हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. गौतम हसबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश हसबे,वसंत हसबे,आशुतोष हसबे,शिवाजी हसबे, अनिल हसबे, संजय हसबे सर्व रा चांदेवाडी ता. आजरा, जि. कोल्हापूर यांच्या विरोधात तर आशुतोष हसबे यांच्या फिर्यादीवरून गौतम हसबे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हसबे कुटुंबीयांमध्ये शेत जमिन गट नं.४४, चांदेवाडी येथील शेताचा वाद आहे. सदर मारामारीचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

संबंधित पोस्ट

उचंगी परिसरात हत्तीचा धुमाकूळ पावर ट्रीलर केले पलटी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजर्‍यातून शाळकरी मुलाचे अपहरण ….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!