mrityunjaymahanews
अन्य

अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

 

 

अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

उत्तूर – आजरा मार्गावर पेंढारवाडी गावाजवळ शनिवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये शंकर लक्ष्मण आजगेकर (वय ७५) यांचा मृत्यू झाला.

याबाबतची अधिक माहिती अशी…

पेंढारवाडी येथील शेतकरी शंकर लक्ष्मण आजगेकर हे सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान शेतातून म्हशींना घेऊन घरी जात होते. त्याचवेळी उत्तूरकडून आज-याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने शंकर आजगेकर यांना जोरात धडक दिली. त्यानंतर वाहनचालक न थांबता पुढे निघून गेला. यामध्ये आजगेकर गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. म्हैसही गंभीर जखमी झाली आहे.

एप्रिल महिना संपत आला तरीही गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या गर्दीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. प्रचंड प्रमाणावर या मार्गावरून गोव्याच्या दिशेने वाहतूक सुरू असून बेधडकपणे वाहन चालक वाहन हाकताना दिसतात. आजगेकर यांना धडक दिलेल्या वाहन चालकाने घटनास्थळावर थांबून त्यांची कोणतीही चौकशी न करता पलायन केल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुंबई- पुणे मार्गावर आजरा आगाराकडून जादा बसफेऱ्या...

आजरा आगाराकडून उन्हाळी जादा वाहतूक करिता खालील बसेस आरक्षणासाठी लावण्यात आल्या आहेत. तरी सर्व प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आजरा आगाराकडून करण्यात आले आहे.

१.आजरा-हात्तीवडे परेल – ७.०० वा.
परेल- हात्तीवडे- आजरा – ७.०० वा.

२.आजरा – बोरिवली – १६.३० वा.
बोरिवली – आजरा – १६.०० वा.

३.आजरा – स्वारगेट – ०६.१५ वा.
स्वारगेट – आजरा – १४.३० वा.

४.आजरा – वल्लभनगर – ०८.३० वा.
वल्लभनगर – आजरा – ०८.१५ वा.
वल्लभनगर – स्वारगेट – आजरा – १९.०० वा.

संबंधित पोस्ट

संकेश्वर -बांदा रस्त्याचे काम रोखण्यासाठी मशिनरीना बांधली जनावरे

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

GROUND REPORT

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!