mrityunjaymahanews
अन्य

आजऱ्याचे माजी सरपंच मनोहर फळणीकर यांचे निधन…

मनोहर  फळणीकर यांचे निधन

आजरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व कै. काशिनाथअण्णा चराटी आणि कै.माधवराव देशपांडे यांचे विश्वासू सहकारी श्री. मनोहर लक्ष्मण फळणीकर (आबा)यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.

अण्णाभाऊ संस्था समूहातील आजरा अर्बन बँक,जनता शिक्षण संस्था या संस्थांसह विविध संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 

खुशखबर…आजरा कारखान्याची फेब्रुवारी अखेरची ऊस बिले जमा ::

आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची दि.१.२.२०२३ ते २५.२.२०२३ या कालावधीत गाळप झालेल्या ५२१७७.७०५ मे. टन ऊसाची रू.३०००/- प्र. मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रू.१५.६५ कोटी विनाकपात संबंधीत शेतक-यांच्या खातेवरती बँकेत जमा केली असुन हंगामात आलेल्या संपुर्ण ऊसाचे बिल आदा झाले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. सुनिल शिंत्रे यांनी दिली.

आजरा साखर कारखान्याने आजअखेर ११९ दिवसांत ३,३६,२१६.५०९ मे.टन ऊसाचे गाळप करून सरासरी १२.११ टक्के साखर उता-याने ४०६९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. व्यवस्थापनाने ४ लाख मे. टन ऊसाचे गाळप करणेचे उदिष्ट ठेवले होते पण अती पावसामुळे ऊस उता-यामध्ये १० टक्के घट झाली. तसेच तोडणी – वाहतुक यंत्रणा कांही अंशी कमी पडली. त्यामुळे ठरविलेले उद्दीष्ट साध्य करता आलेले नाही. तरीपण संपुर्ण अडचणींना तोंड देत कारखान्याने ३३६२१६ मे. टनाचे गाळप केले. त्याकरीता कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या ऊसाची बिले, तोडणी वाहतुक कंत्राटदार, मालपुरवठादार, कंत्राटदार यांची बिले तसेच कर्मचारी यांचा पगार वेळेत आदा करणेचे नियोजन केले असुन कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या सहकार्याने आजअखेर आलेल्या ऊसाची संपुर्ण बिले आदा केलेली आहेत. कारखान्याने केलेले आहे. त्याचप्रमाणे चालु लागवड हंगामाकरीता ऊसाच्या नोंदी घेण्याचे काम शेती गट कार्यालयात देखील सुरू आहे. कृपया सभासदांनी आपल्या संपुर्ण ऊसाची नोंद करून सहकार्य करावे. गुढी पाढव्याचे औचित्य साधुन हंगाम २०२३-२४ करीता तोडणी वाहतुकीचे करार चालु केले आहेत. तरी कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधुन तोडणी वाहतुकचे करार पुर्ण करणेचे आहे असेही याप्रसंगी त्यांनी सांगीतले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. आनंदा कुलकर्णी व संचालक श्री. अशोक चराटी, श्री. वसंतराव धुरे, श्री. मधुकर देसाई, श्री. दिगंबर देसाई, श्री. सुधीर देसाई, श्री. मारूती घोरपडे, मा. संचालिका सौ. सुनिता रेडेकर, संचालक श्री. उदयसिंह उर्फ मुकुंदराव देसाई, श्री. लक्ष्मण गुडुळकर, श्री. दशरथ अमृते श्री. राजेंद्र सावंत, श्री. अनिल फडके, श्री. मलिककुमार बुरूड, श्री. जनार्दन टोपले, संचालिका सौ. विजयमाला देसाई, श्री. तानाजी देसाई तसेच कार्यकारी संचालक, डॉ. टी. ए. भोसले सेक्रेटरी, श्री. व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.

सिरसिंगी येथे अंतर्गत रस्त्यासाठी २० लाख रु. निधीची मागणी…..

कोल्हापूर येथे भाजपचे जिल्ह्याचे नेते मा खासदार धनंजय महाडिक साहेब यांची भेट मा संग्रामसिंह कुपेकर यांच्या समवेत आजरा कारखान्याचे संचालक दिगंबर देसाई यांनी घेतली. यावेळी सिरसिंगी ता आजरा येथील कामांसाठी अंतर्गत खडीकरण व डांबरीकरणासाठी २० लाख रुपयांची निधी निधीची मागणी निवेदन देऊन करण्यात आली यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्याला सिरसिंगी गावासाठी २० लाख रुपये चा निधी देण्याचे मान्य ही केले.

यावेळी निवेदन देताना सोबत संग्रामसिंह कुपेकर, दिगंबर देसाई, भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कृष्णराज महाडिक, नारायण साटपे, राजू मुरुकटे, प्रभाकर देसाई यांच्या सह प्रमुख उपस्थित होते.

सोमवारी  आजरा तहसील कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलाचा मोर्चा

महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अन्यायी शासन निर्णयाच्या विरोधात सातारा जिल्ह्यात कोयना धरण व बामनोली तर कोल्हापूर जिलधिकारी कार्यालय येथे धरणग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाबाबत सरकार अजून गंभीर दिसत नाही. म्हणून श्रमिक मुक्ती दल आजरा तालुक्यातील अपंग, विधवा परीतकत्या आणि धरणग्रस्त स्त्री पुरुष आजरा तहसील कार्यालयावर मोर्चाने जाऊन निवेदन देणार आहेत.

राज्य सरकारने याबाबत तात्काळ भूमिका घेऊन धरणग्रस्त प्रतिनिधी सोबत बैठक न घेतंल्यास सर्वजण या आंदोलनात सहभागी होऊ हे सांगण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे अशी माहिती काँग्रेस संपत देसाई यांनी दिली.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बंदी आदेश झुगारून ‘उचंगी’चे काम बंद पाडण्याचा प्रकल्पग्रस्तांचा प्रयत्न … पोलीस व प्रकल्पग्रस्तांची झटापट

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यातील आजच्या ठळक घडामोडी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!