mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार १ जून २०२६

गोवंश हत्याप्रकरणी आजरा आठ जणांना पोलिस कोठडी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आमराई गल्ली, आजरा येथील कत्तलखान्यात काल शनिवार दिनांक ३० रोजी दस्तगीर बेपारी यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये गाय व बैलाची कत्तल केल्याप्रकरणी तौशीफ इस्माईल खेडेकर रा. आमराई गल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलिसांनी अबूतालिम रशीद बेपारी, रेहान अबूतालीम बेपारी, फय्यूम खानसाब बेपारी, खलील रशीद बेपारी, सोहेल सलाम बेपारी, अल्ताफ खलील बेपारी, दस्तगीर खलील बेपारी व सलाम रशीद बेपारी या आठ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.

एरंडोळ येथे पंचायत राज नेतृत्व विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

एरंडोळ ता.आजरा येथे कोकण विकास सोसायटी, पणजी, सामाजिक संवेदना संस्था, आजरा आणि ग्रामपंचायत एरंडोळ यांच्या संयुक्त विद्यमाने WeLead अंतर्गत एरंडोळ येथे पंचायत राज नेतृत्व विकास कार्यक्रमाचे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एरंडोळ, पारपोली, पेरणोली, गवसे, हाळोली आणि कानोली गावांतील ग्रामपंचायत प्रतिनिधी व महिला नेतृत्वाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सामाजिक संवेदना संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश मोरुस्कर यांनी स्वागत केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना आणि उद्देश स्पष्ट करताना राजेंद्र कांबळे यांनी पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांच्या नेतृत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

उद्घाटन सत्रात बोलताना सभापती सौ. जयश्री गाडे यांनी पंचायत राज प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामकारभाराची सखोल माहिती मिळेल आणि महिलांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उपसभापती सौ.यशोदा पोवार यांनी मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग हेच कार्यक्रमाचे यश असल्याचे सांगितले.

मुख्य वक्त्या लता पाकले यांनी पंचायत राज व्यवस्थेतील अधिकार, कर्तव्ये, ग्रामपंचायत प्रशासन, निधी नियोजन, ग्रामविकास, आरोग्य, पाणीपुरवठा आणि पर्यावरणपूरक विकास याविषयी मार्गदर्शन केले. .

एरंडोळचे उपसरपंच भीमराव माधव आभार मानले. यावेळी शंकर पाटील पेरणीच्या सरपंच मन श्री देसाई राजेंद्र कांबळे यांच्यासह मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मिलिंदनगर येथे रेणुकादेवी कुंड बांधकामाचा शुभारंभ

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर ग्रामपंचायतीच्या वतीने मिलिंदनगर येथे १५ व्या वित्त आयोगातून मंजूर करण्यात आलेल्या रेणुकादेवी कुंड बांधकामाचा शुभारंभ सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कामासाठी ४ लाख ७८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

यावेळी सरपंच किरण आमणगी यांनी ग्रामविकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असून मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास उपसरपंच सुनिता हतिरगे, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, भैरू कुंभार, मिलिंद कोळेकर, संदेश रायकर, संभाजी कुराडे, समिक्षा देसाई, सुवर्णा नाईक, अनिता घोडके, आशा पाटील, सुनिता केसरकर, सरिता कुरूणकर, सविता सावंत, संजय गुरव, जोमा हुले, सुधाकर हुले, अनिल हुले, समीर हेगडे, गिरीष ऐवाळे, भारत ऐवाळे, परशराम कांबळे, सोनाबाई हुले, महादेव मोरवाडकर, ठेकेदार अभिजीत गंगापुरे यांची उपस्थिती होती.

स्वागत सरपंच किरण आमणगी यांनी केले तर आभार विजय हेगडे यांनी मानले

सुरेखा जाधव यांचे निधन…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वाटंगी ता. आजरा येथील सुरेखा विनायक जाधव ( वय ३४ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांचा पश्चात पती विधायक,मुलगा असा परिवार आहे. विनायक जाधव यांच्या आईचे महिनाभरापूर्वी निधन झाले होते. त्या पाठोपाठ आता भक्तीचे निधन झाल्यामुळे जाधव कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. वाटंगी पंचक्रोशीतून या घटनेबाबत हळहळ व्यक्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या

♦ ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपुर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी अंधेरी येथे निधन

♦ विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर बंगळूरूने दुसऱ्यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले आहे.

 

आजचे पंचांग

दिनांक : १ जून २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : प्रथम (दुपारी ०४.३७ पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : ज्येष्ठा नक्षत्र (सायंकाळी ०७.०८ पर्यंत) त्यानंतर मूळ नक्षत्र
योग : सिद्ध योग (सकाळी ०६.१८ पर्यंत) त्यानंतर साध्य योग
करण : कौलव करण (दुपारी ०४.३७ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी (सायंकाळी ०७.०८ पर्यंत) त्यानंतर धनु राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.४० ते सकाळी ०९.१९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.११
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संव

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात किरीट सोमय्या यांचा निषेध…

mrityunjay mahanews

Breaking News…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रामतीर्थ यात्रेसाठी मुस्लिम बांधवही सरसावले… यात्रेला परवानगीची मागणी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!