mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार  दिनांक ६ मे २०२५       

कानोली येथे लक्ष्मी यात्रेला प्रारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कानोली (ता. आजरा) येथील १३ वर्षांनी लक्ष्मी देवीची यात्रा आज दि.६ व उद्या ७ मे रोजी होत आहे. यात्रेनिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

       आज मंगळवार ६ रोजी सकाळी देवीची पूजा, अभिषेक होणार आहे. त्यानंतर रात्री देवीची मिरवणूक पार पडणार आहे. बुधवार ७ रोजी पहाटे लक्ष्मीला बळ दिल्यानंतर मुख्य यात्रेला प्रारंभ होणार आहे. या नियोजनासाठी ग्रामपंचायतीने योग्य ते नियोजन केले आहे. मुंबई मंडळाचेही सहकार्य लाभले आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन विभागाकडून योग्य नियोजन केले आहे. 

     यात्रा काळात क्रिकेट स्पर्धा, रस्सीखेच याशिवाय महिलांसाठी होम मिनीस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच यात्रेच्या मुख्य दिवशी बुधवार ७ रोजी रात्री ११ वाजता महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा गीतराधाई हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

१२ वीचा आजरा तालुक्याचा निकाल ९२.४५ टक्के 

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वीचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी जाहीर केला. यामध्ये आजरा तालुक्याचा निकाल ९२.४५ टक्के इतका लागला आहे. ८३५ पैकी ७७२ विद्यार्थी पास झाले आहेत.

तालुक्यातील  निकाल 

आजरा  महाविद्यालय – ८९.७४ टक्के

आजरा  महाविद्यालय व्होकेशनल विभाग – ९७.५६

उत्तूर ज्युनिअर कॉलेज – ७२.७२टक्के

बापूसाहेब सरदेसाई ज्युनिअर कॉलेज निंगुडगे – १०० टक्के

ऊर्दू ज्यूनिअर कॉलेज आजरा – ८५.७१टक्के

व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज आजरा -९८.६९

ओम पॅरामेडिकल आजरा – १०० टक्के

(पं. दीनदयाळ विद्यालय) आजरा – १०० टक्के

नवकृष्ण व्हॅली उत्तूर – १०० टक्के

कॉलेजनिहाय विशेष गुणवंत (कंसात टक्केवारी)

आजरा महाविद्यालय, आजरा

सायन्स-

गेहलोत काजल गोपीराम ( ९०.७१ ) प्रथम क्रमांक

नार्वेकर सानिया सुरजकुमार ( ८८ ) द्वितीय कमांक

डोंगरे साईनाथ रविंद्र ( ८२.३३ ) तृतीय कमांक

आर्टस-

शिकलगार निदा अल्लाबक्ष (६८.३८) प्रथम कमांक

पोवार अजित अशोक ( ५९.१७) द्वितीय क्रमांक

भादवणकर यश राघू ( ५८.५० ) तृतीय क्रमांक

वाणिज्य –

मनगुतकर प्रफुल्लता बाळू ( ८८.६७ ) प्रथम क्रमांक

पन्हाळकर प्रणाली महेश (८२.५० ) द्वितीय क्रमांक

येसणे विनोद जानू (८१.००) तृतीय क्रमांक

मार्केटिंग ॲन्ड रिटेल मॅनेजमेंट-

दारुटे सायली तातोबा (६७.३३) प्रथम कमाक

कांबळे प्रतिक उत्तम ( ५८.१३ ) द्वितीय कमांक

कोलेकर वैष्णवी बसवर ( ५६.६७ ( तृतीय क्रमांक

इलेक्ट्रीक टेक्नॉलॉजी-

कोकरे अंजना भिकाजी ( ७०.५० ) प्रथम क्रमांक

कांबळे साहील रामू (६०.३३ द्वितीय क्रमांक

गुंजकर पार्थ राजाराम ( ६७.३३ ) तृतीय क्रमांक

बॅकींग फायनान्सिअल सर्व्हसेस ॲन्ड इन्शुरन्स-

कोरवी नम्रता भिकाजी ( ८०) प्रथम क्रमांक

मोहिते तेजस्विनी राजू व देसाई साक्षी जनार्दन(७७.६७)
द्वितीय कमांक

मिसाळ शालन अशोक ( ७०.१७ ) तृतीय क्रमांक

व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज, आजरा

विज्ञान विभाग-

नावलकर प्रेरणा रविंद्र ( ७९.५०)प्रथम क्रमांक

पाटील समिक्षा गोविंद ( ७७) द्वितीय क्रमांक

सुतार किरण नारायण (७३.१७) तृतीय क्रमांक

वाणिज्य विभाग –

गुरव त्रिवेणी पंढरीनाथ (७८.८३ ) प्रथम क्रमांक

गुरव चंदना सूर्यकांत (७७.५०) द्वितीय क्रमांक

येसणे प्रांजली बाळासो (७६.६७) तृतीय क्रमांक

आर्ट्स विभाग-

गुरव वैशाली मनोहर (७१.१७) प्रथम क्रमांक

कांबळे सुजाता शशिकांत (६६) द्वितीय क्रमांक

कांबळे अभिषेक शिवाजी (६०.८३) तृतीय क्रमांक

डॉ झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजरा

आर्ट्स-

केंद्रात पहिले तीन या प्रशालेचे

नजराना अयुब लमतुरे (७८.३३) प्रथम क्रमांक

अडकुरे खुशनुमा असलम (७६) द्वितीय क्रमांक

शेख फातिमा सलाऊद्दीन(७५) तृतीय क्रमांक

पंडित दीनदयाळ हायस्कूल व ज्यु. कॉलेज आजरा

सायन्स –

हर्षदा दिलीप गुरव (७३.३३) प्रथम क्रमांक

शुभम दशरथ पाटील.(७३) द्वितीय क्रमांक.

वैष्णवी आप्पा गिलबिले (६७.८३) तृतीय क्रमांक.

जंगल समृद्धीकरणाचा प्रस्ताव बनविण्यासाठी बैठक घेण्याच्या वनविभागला सूचना…

जिल्हाधिकारी व आ सतेज पाटील यांच्यासह झालेल्या बैठकीत निर्णय…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा, चंदगड आणि भुदरगड तालुक्यात वन्यप्राणी आणि शेतकरी संघर्ष संपविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी, पर्यावरणातील तज्ञ आणि चळवळीचे कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक पंधरा दिवसाच्या आत बोलवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कोल्हापूर वनविभागाला दिले. आ. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील वनहक्काचे दावे आणि जंगली प्राण्यांचा उपद्रव यावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्देश दिल्याची माहिती कॉ. संपत देसाई यांनी दिली.

      याबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले, जंगली प्राणी आणि शेतकरी यांचा संघर्ष कायमचा संपवायचा असेल तर जगले समृध्द केली पाहिजेत. यासाठी आजरा, चंदगड आणि भुदरगड तालुक्यात जंगल समृद्धीकरणाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी काय करता येईल याबत जिल्हाधिकारी यांनी यावर तातडीने बैठक बोलवण्यासाज निर्देश दिल्याने गेली दहा वर्षे चळवळीने घेतलेल्या भूमिकेला आणि केलेल्या संघर्षाला आता मूर्त स्वरूप येण्याची शक्यता तयार झाली आहे.

      आजरा चंदगड, भुदरगडसह जिल्ह्यातील सात तालुक्यातील धनगर तसेच वननिवासी कुटुंबाचे वन हक्काचे दावे तातडीने तपासण्याच्या सूचना त्यांनी सर्व प्रांताना दिल्या आहेत.

      तालुक्यातील हरपवडे, चितळे आणि आवंडी धनगर वाड्यावरील दावे तपासून जिल्हासमितीला पाठवण्याच्या सूचना त्यानी प्रांताना दिल्या.

      बैठकीला विजय देवणे, राहुल देसाई, कॉ.सम्राट मोरे, अविनाश भाले, राजेंद्र कांबळे, प्रकाश मोरुस्कर, बयाजी येडगे, जानू कोकरे, कृष्णा भारतीय यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

समाजाभिमुख कार्यामुळेच रवळनाथची प्रगती : प्रो. के. बी. गुडसी

धारवाड शाखेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ग्रामीण भागात सुरू झालेल्या श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीने स्थापनेपासूनच व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजातील सर्व स्तरातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न ही संस्था बँकिंग व्यवसायाच्या माध्यमातून करत आहे. समाजाभिमुख कार्यामुळेच या संस्थेने १००० कोटीहून अधिक व्यवसाय करून सहकार क्षेत्रात यश मिळवले आहे असे गौरवोद्गार कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथील माजी कुलगुरू प्रो. डॉ. के.बी. गुडसी यांनी काढले.

    श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीच्या १५ व्या धारवाड शाखेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. धारवाड येथील असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिविल इंजिनियर्स चे अध्यक्ष श्री. सुनील बागेवाडी, रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले, उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे, धारवाड शाखा चेअरमन प्राचार्य शिवानंद चौगला, सीईओ श्री. डी. के मायदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.

       प्रोफेसर डॉ.के.बी. गुडसी म्हणाले, नोकरी करत असतानाच श्री. एम. एल. चौगुले यांच्या कुशल नेतृत्वामुळेच रवळनाथ संस्थेची प्रगती होत आहे. भविष्यात ५० शाखांसह आणखी काही राज्यांमध्ये संस्थेच्या कार्य विस्तार होईल याची खात्री आहे.

      श्री. सुनील बागेवाडी म्हणाले, कोणतीही राजकीय पद नसताना सहकार क्षेत्र श्री. एम. एल. चौगुले यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. या संस्थेच्या कर्नाटकातील चौथ्या शाखेचा शुभारंभ झाला. या शाखेच्या प्रगतीसाठी व अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितच आमचे सहकार्य राहील.

      प्रारंभी धारवाड शाखा कार्यालयात कोनशिला अनावरण, श्री रवळनाथ प्रतिमापूजन झाले. त्यानंतर स्वागत गीत व दीपप्रज्वलनाने मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी धारवाड शाखेचे नुतन चेअरमन प्राचार्य शिवानंद चौगला, शाखा सल्लागार प्रा. बी. व्ही. नाडगौडा, प्रा. ए. जी. उगारकर, प्रा. जगदीश गुडगूर, डॉ. शिवानंद अंगडी, प्राचार्य लिंगराज होरकेरी, श्री. महांतेश गुंजेट्टी, सौ. रेखा शेट्टर, शाखाधिकारी श्री. संतोष पाटील यांच्यासह बिल्डर श्री. प्रदीप जैन, जागा मालक श्रीमती अरुंधती गलगली यांचा सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमास संचालक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, प्रा. व्ही. के. मायदेव, श्री. महेश मजती, प्रा. विजय आरबोळे व श्रीमती उमा तोरगल्ली, सौ. सविता चौगुले, सौ. श्रद्धा निळपणकर, पुणे शाखा चेअरमन श्री. सुहास नाडगौडा, बेळगावी शाखा चेअरमन प्राचार्य आनंद मेणसे, निपाणी शाखा चेअरमन श्री. व्ही. आर. पाटील, चिक्कोडी शाखा चेअरमन अॅड. जयपाल बोके, माजी संचालक श्री. बी. बी. आरबोळे, प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे, श्री. एम. बी. दळवी यांच्यासह सर्व संचालक, शाखा सल्लागार, अधिकारी व कर्मचारी, सभासद, हितचिंतक, धारवाड येथील नागरिक उपस्थित होते.

सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी बापू नेऊंगरे व सौ.सुषमा पाटील

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुका सरपंच संघटनेची बैठक मारुती मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थापक अध्यक्ष संभाजीराव सरदेसाई, संतोष बेलवाडे, संदीप चौगले, नामदेव जाधव, सल्लागार अमोल बांबरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.यावेळी पुरुष कार्यकारणी आणि महिला कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ती पुढील प्रमाणे…

आजरा तालुका सरपंच संघटना- पुरुष कार्यकारणी…

श्री. बापू भीमराव निउंगरे – मडीलगे – अध्यक्ष

श्री. विलास शामराव पाटील – विटे-कार्याध्यक्ष श्री.मधुकर रामचंद्र जाधव वाटंगी-उपाध्यक्ष,श्री.महादेव संभाजी दिवेकर-भादवणवाडी-उपाध्यक्ष,श्री. समीर पांडुरंग देसाई- शृंगारवाडी(उचंगी)-सरचिटणीस,श्री . बयाजी भैरू मिसाळ- आवंडी- सहसचिव,श्री. पांडुरंग जानू खवरे- सुलगाव-खजिनदार,श्री . रघुनाथ बाळू सावंत-जाधेवाडी-सदस्य, श्री.मारुती लक्ष्मण पोवार- वेळवट्टी-सदस्य,श्री.आनंदा राणकू कांबळे- गजरगाव-सदस्य,श्री. प्रशांत कोटकर- हाजगोळी खु.-सदस्य,श्री.नारायण विश्वास देसाई-बेलेवाडी हु.-सदस्य

आजरा तालुका सरपंच संघटनेची महिला कार्यकारणी…

सौ.सुषमा सुभाष पाटील-कानोली-अध्यक्षा

सौ.सविता सुनील जाधव-हजगोळी बु.-कार्याध्यक्षा,सौ.भारती कृष्णा डेळेकर- सोहाळे-सरचिटणीस,सौ.कल्पना रामचंद्र डोंगरे-खानापूर-उपाध्यक्षा,सौ.सरिता सुभाष पाटील-एरंडोळ-उपाध्यक्षा,श्रीमती प्रियांका चंद्रकांत आजगेकर- होणेवाडी-सहसचिव,सौ.स्मिता ज्ञानदेव पाटील-होण्याळी-खजिनदार,सौ.कल्पना वसंत चाळके-देवर्डे-सदस्या,सौ. शुभंगी सदाशिव गुरव-का.कांडगाव-सदस्या,सौ.स्वाती विजय कोंडूसकर-चांदेवाडी-सदस्या,श्रीमती बनाबाई विजय शिंदे- हालेवाडी-सदस्या,सौ.सुनीता मारुती कांबळे- सरंबळवाडी-सदस्या
13.सौ.जयश्री धोंडिबा गिलबिले – लाकुडवाडी- सदस्या

        सदर नूतन कार्यकारणी पुढील एक वर्षासाठी निर्धारित केली असून ही संघटना कोणत्याही इतर संघटनेशी संलग्न न राहता स्वतंत्रपणे काम करेल व संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील सरपंच, सदस्य व ग्रामपंचायतीच्या संदर्भातील अडचणी, मागण्या व प्रशिक्षण यासंदर्भात काम केले जाईल असे यावेळी मारुती मोरे यांनी सांगितले.

आजरा साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी घेतली सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांची भेट

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यास अडचणीतून बाहेर काढावयाचे झालेस, सर्वप्रथम कारखान्याची प्रलंबित शासकीय देण्याबाबत योग्य नियोजन करून त्यामध्ये सवलती मिळविणे आवश्यक आहे. त्यांचाच भाग म्हणून अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांनी संचालक व अधिकारी यांचे समवेत राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील व साखर आयुक्त श्री. सिद्राम सालीमठ यांची पुणे येथे जाऊन भेट घेतली.

      या भेटीत कारखाना उभारणी काळात शासनाकडून प्राप्त झालेल्या ३ कोटी कर्जावरील देय राहीलेली व्याजाची रक्कम रु. १२ कोटी १२ लाख कारखान्याची आर्थिक अडचण असलेने भरणे शक्य नाही त्यामुळे ती माफ करणेंत यावी. त्याचबरोबर शासकीय भागभांडवलामधील परतफेड करावयाची शिल्लक रक्कम रु. ६ कोटी ९ लाख पांच वर्षाच्या विलंब कालावधी नंतर पुढे समान १५ हप्त्यांत भरणेची सवलत मंजूर होवून हप्ते पाडून मिळावेत याबाबत निवेदन देवून विनंती करणेत आली. या दोन्ही बाबींवर ना. सहकार मंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

      यावेळी संचालक श्री उदय पवार, जिल्हा बँक प्रतिनिधी श्री. सुधीर देसाई, संचालक श्री. अनिल फडके, श्री.रणजीत देसाई, कार्यकारी संचालक श्री. संभाजी सावंत, व सेक्रेटरी श्री व्यंकटेश ज्योती उपस्थित होते

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पाऊस थांबता थांबेना… आजऱ्यातील परिस्थिती …व्यंकटराव”च्या शिक्षिका भारती कांबळे यांना आंतरराज्य पुरस्कार…आजरा महाविद्यालयात झिम्मा फुगडी उत्साहात..वर्षभरात 500 कोटीच्या अँटिबायोटिक औषधांची खरेदी ! कोणताही विचार न करता भारतीय करत आहेत औषधांचा उपयोग

mrityunjay mahanews

Big Breaking…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गजरगाव येथे जुगार खेळताना आठ जण ताब्यात

mrityunjay mahanews
error: Content is protected !!