mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि.५ मार्च २०२५

व्हाट्सअप वरून महिलेची बदनामी…
एका विरोधात गुन्हा नोंद..

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      स्थानिक ग्रामस्थ मंडळाच्या व्हाट्सअप ग्रुप वरून पेद्रेवाडी येथील एका महिलेबाबत अश्लील मेसेज व्हायरल करून अपमानित केल्याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दिनकर विष्णू चव्हाण रा. पेद्रेवाडी ता. आजरा यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती आजरा पोलिसांनी दिली आहे.

      राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दलही बदनामीकारक मजकूर व्हाट्सअप च्या माध्यमातून पसरवला असल्याने चव्हाण यांच्या विरोधात महिलेच्या बदनामीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

      पुढील तपास आजरा पोलीस स्टेशनचे अजय सिंदकर करीत आहेत.

चिरे वाहतूक करणारा ट्रक व कारची धडक
दोन्ही वाहनांचे नुकसान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      चिरे भरण्यासाठी आजऱ्याहून चौके/ मालवणच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला ( एम. एच. ०७ ए. जे. ६८०९ ) चुकीच्या दिशेने समोरून येणाऱ्या कारने (एम.एच.१७ ए.ई.१८१३) जोरदार धडक दिल्याने कारचालक जखमी झाला तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.आजरा- आंबोली मार्गावर गवसेनजीक हॉटेल चिन्मय समोर मंगळवारी सदर अपघात झाला.

      अपघाताची वर्दी शब्बीर बशीर आगा (रा. कासार कांडगाव, ता.आजरा) यांनी पोलिसांत दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून उत्तूर ग्रामपंचायतीला थकीत वीजबिलासाठी सव्वा सहा लाखांचा धनादेश

           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      उत्तुर ता. आजरा ग्रामपंचायतीची साडेबारा लाख रुपयांचे थकीत वीजबिल आहे. थकित वीजबिलामुळे ग्रामपंचायतीला नवीन जलजीवन पाणीपुरवठा योजनेसाठी विद्युत कनेक्शन मिळणे थांबले आहे. त्यावर इलाज म्हणून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून थकीत वीजबिलाची निम्मी रक्कम म्हणजेच सव्वा सहा लाख रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतीला देण्यात आला. सरपंच किरण अमनगी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हा धनादेश स्वीकारला. उर्वरित सव्वा सहा लाख रुपये ग्रामपंचायतीकडून व्यवस्था करून थकीत वीजबिल भरले जाणार आहे. यामुळे नवीन झालेल्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत जोडणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

      याबाबत बोलताना सरपंच किरण अमनगी म्हणाले, उत्तुरसारख्या १५ हजार लोकसंख्येच्या गावासाठी आंबेओहोळ प्रकल्पावरून नवीन जलजीवन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आलेली आहे. परंतु; जुन्या योजनेच्या साडेबारा लाख रुपये वीजबिलाच्या थकबाकीमुळे नवीन कनेक्शन मिळणे अडचणीचे झाले होते. यावर पर्याय म्हणून निम्म्या रकमेची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आणि निम्मी रक्कम नाम. हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यामुळे लवकरच जलजीवन योजनेची वीजजोडणी होऊन ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि उत्तूरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पिण्याचा पाणीपुरवठा होईल.

      यावेळी सरपंच किरण आमनगी, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष देसाई, मारुती घोरपडे, महेश करंबळी, संजय उत्तूरकर, सविता कुरुणकर , सुनिता हत्तरगे, लता गुरव, सौ. आशा पाटील, सुवर्णा नाईक, सुनिल रावण, सुधीर सावंत ग्रामस्थ उपस्थित होते. 

गायकवाड कुटुंबीयांना मदत कार्य सुरूच…
दातृत्वाचे हात पुढे आल्यानंतर कुटुंब सावरत आहे…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       गांधीनगर , आजरा येथील आरती राहुल गायकवाड यांचे घर आगीत जळून खाक झाले. या घटनेनंतर सामाजिक भान असणाऱ्या अनेक मंडळींंनी गायकवाड कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे केल्याने ते कुटुंब हळूहळू सावरू लागले आहे.

      आजरा येथील हॅप्पी वुमन ग्रुपने मदतीचा हात पुढे केला. तांदूळ, गहू, तेल, बिस्कीट पुडे, साड्या व कपडे व भांडी अशा जीवण उपयोगी वस्तू दिल्या. सामाजिक कार्यकर्ते गीता पोतदार, भैरवी सावंत, धनश्री देसाई, वंदना आजगेकर, माधुरी पाचवडेकर यांनी मदत केली आजरा महाविद्यालयातील महिला प्राध्यापक उपस्थित होत्या. त्यांनी ब्लॅंकेट, चटई. भांडी, व धान्य या वस्तूंची मदत केली.यावेळी नेहा पेडणेकर, रागिणी राजमाने,लता शेटे, सुवर्णा धामणेकर, वैशाली देसाई, शोभा केंद्रे, पुनम पाटील यांनी मदत केली.

       गायकवाड कुटुंबीयांना तात्काळ मदत म्हणून लागणारे गृहोपयोगी साहित्य , कपडे , शालेय साहित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे (उ.बा.ठा.) गटाच्या महिला तालुका उपप्रमुख सौ.मीनाक्षी संतोष पुजारी यांनी मदत केली आहे आणि थोड्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

आजरा येथे शनिवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

          बेळगाव निवासी गुरुदेवता परमपूज्य “श्री कलावती देवी” यांचा आजरा गावातील वार्षिक हरिनाम सप्ताह शुद्ध कला भजनी मंडळ व बाल संस्कार केंद्र यांच्यावतीने श्री हरीमंदिर बेळगाव यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे

      शनिवार दि.८ ते बुधवार दि. १२ मार्च अखेर दूरदुंडेश्वर कार्यालय, आजरा येथे आयोजित करण्यात आला आहे.या कालावधीत रोज सकाळी ७ ते ८:३० सकाळचे भजन, सायंकाळी ४ ते ५:३० सायंस्मरण भजन, उत्सवाचे चातुर्मासानंतरची एकादशीचे भजन रात्री ८ ते ९:३० या कालावधीत होणार आहे.

         वरील सर्व कार्यक्रमांना गावातील व पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

उत्तुरच्या जनता सह.दूध संस्थेच्या चेअरमनपदी मारुती सावंत…

सुशीला घेवडे उपाध्यक्षा

           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      येथील जनता सह दूध व्याव . संस्थेच्या . चेअरमन पदी मारूती धोंडिबा सावंत व व्हा चेअरमन पदी सुशिला निवृती घेवडे यांची निवड बिनविरोध झाली. चेअरमन पदासाठी सचिन उत्तूरकर यांनी नाव सुचविले . गोपाळ बरडे यांनी अनुमोदन दिले तर व्हा चेअरमन पदासाठी अमृत पाटील यांनी नाव सुचविले . रमेश ढोणुक्षे यांनी अनुमोदन दिले .

      नूतन पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली आभार सचिव भैरू तानवडे यांनी मानले.

निधन वार्ता
कृष्णाबाई गिलबिले

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     चांदेवाडी ता.आजरा येथील कृष्णाबाई रामचंद्र गिलबिले ( वय ९२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे

      मुंबईस्थित उद्योजक भिकाजी गिलबिले यांच्या त्या आई होत. आज बुधवारी सकाळी साडेआठ वाजता चांदेवाडी येथे अंत्यविधी कार्यक्रम आहे.

 

संबंधित पोस्ट

प्रभाग आठ मधून माझा विजय निश्चित…सुहेल काकतीकर

mrityunjay mahanews

संजय कडोली यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बेपत्ता तरुणाचा मृतदेह हिरण्यकेशी नदीपात्रात आढळला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!