




बनावट धनादेश प्रकरणी एकाला शिक्षा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बनावट धनादेश देवून फसवणुक केल्या प्रकरणी नामदेव राम शेंडे (रा. वेताळनगर, होनेवाडी) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, आजरा यांनी शिक्षा सुनावली आहे. शेंडे यांनी यशवंत राजाराम देसाई रा. वाणीगल्ली आजरा यांच्याकडून आक्टोबर ते डिसेंबर २०१६ अखेर घर बांधकामसाठी पाच लाख इतकी रक्कम सहा महीन्यात परत करतो म्हणून घेतली होती. परंतु शेंडे यांनी मुदतीत रक्कम परत दिली नाही. घेतलेल्या रक्कमेसाठी शेंडे यांनी देसाई यांना विविध संस्थाचे तीन धनादेश दिले होते ते वटले नाहीत. यामुळे शेंडे यांना एक वर्ष साध्या कारावसाची शिक्षा, दहा हजार रुपये दंड तसेच सात लाख रुपये तीन महीन्याच्या आत देसाई यांना देण्याचा आदेश दिला आहे. तक्रारदारांकडून ॲड. सचिन एस. देसाई यांनी काम पाहीले.



आज-यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यात ठिक- ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी सायंकाळपासून पाऊस सुरू झाला असून तो रात्रभर सुरूच होता. पावसामुळे माळरानावरील भात पिकांची सुरू असलेली सुगी अडचणीत आली आहे.
सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाचे कार्यक्रम दणक्यात सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणच्या मनोरंजनात्मक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात व्यत्यय आला आहे.


माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेने घवघवीत यश संपादन केले. तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मैदानी स्पर्धेमध्ये कु.गणेश रमेश गुंडप १५०० मीटर धावणे प्रथम क्रमांक व ८०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक तसेच कु.धीरज आनंदा सागर ४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक व ३००० मीटर धावणे द्वितीय क्रमांक प्राप्त केला.कु. गणेश विलास पारळे २०० मीटर धावणे तृतीय क्रमांक तर कु.समृद्धी एकनाथ खोत २०० मीटर धावणे व उंच उडी यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच रिले ४०० मीटर धावणे यामध्येही तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या क्रिकेट संघाची तसेच कु.गणेश रमेश गुंडप व कु.धीरज आनंदा सागर यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.
या खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक किरण चव्हाण, क्रीडा व्यवस्थापक लक्ष्मण लोहार व विशेष मार्गदर्शन मंदार हाळवणकर,संकल्प कांबळे यांचे लाभले.


रविवारी आज-यात महाआरोग्य शिबिर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खास नवरात्र उत्सवानिमित बाळासाहेब ठाकरे व आरोग्यदूत फौंडेशन, शिवसेना वैद्यकीय कक्ष आणि रवळनाथ इण्डेन गॅस आजरा आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराचे रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मानसिंग देसाई यांनी दिली.
आमदार प्रकाश आबिटकर,आमदार: राधानगरी, भुदरगड, आजरा यांच्या हस्ते सदर शिबिराचे उद्घाटन होणार आहे.



प्रशांत गुरव यांना विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती,कागल यांचे वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व्यंकटराव हायस्कूलचे शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी सुहासिनीदेवी घाटगे होत्या.
यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष, समरजीतसिंह घाटगे,कार्याध्यक्षा, राजमाता जिजाऊ महिला समिती नवोदिता घाटगे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

निधन वार्ता
दयानंद दोरूगडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव तालुका आजरा येथील व मुंबई स्थित दयानंद गोपाळ दोरूगडे ,(वय ४५ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी. आई, वडील. भाऊ असा परिवार असून ते साळगाव सन्मित्र पत संस्थेचे कर्मचारी होते.

दुर्गामाता दर्शन



(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969




