mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हा

गोवा बनावटीच्या दारूसह गवसे-आजरा येथे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल ताब्यात… शिनोळी-चंदगड येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा…

 

गोवा बनावटीच्या दारूची आजरा मार्गे जोरदार वाहतूक

गवसे-आजरा येथे गोवा बनावटीच्या दारूसह
साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

गवसे (ता. आजरा) येथे गडहिंग्लज उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत विनापरवाना व बेकायदेशीररीत्या राज्यात विक्रीसाठी येणारा गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला आहे. एका चारचाकी मोटारीतून दारूची विक्रीसाठी पनवेलकडे चोरून वाहतूक करण्यात येत होती. रंजित आनंद गुप्ता (वय ३५, पनवेल, जि. रायगड) याला ताब्यात घेतले आहे. १ लाख ८७ हजार ३४० रुपये इतक्या किमतीची दारू व साडे नऊ लाखांची चार चाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीनजीक गवसे येथील तपासणी नाक्यांवर तपासणी सुरू असताना संशयित रित्या जात असलेल्या मोटार (एमएच ०२एफ ई २१७७) या वाहनाची झडती घेतली असता वाहनांमध्ये विदेशी मद्याचे गोवा बनावटीचे २१ बॉक्स मिळून आले. पनवेल, जि. रायगड येथे विक्रीसाठी नेत असल्याचे चालकाने सांगितले. जप्त केलेल्या मद्याची किंमत १ लाख ८७ हजार ३४० रुपये आहे. मोटारीसह ११ लाख ३७ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य आयुक्त कांतिलाल उमाप उपआयुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. एस. गरुड, सहायक दुय्यम निरीक्षक एस.आर.डा बरे, मुकेश लाडके यांच्या पथकाने कारवाई केली .

 

शिनोळी येथील ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा

शिनोळी (ता. चंदगड) येथे बेकायदेशीरपणे चालवलेल्या ऑनलाईन जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारून बेळगाव शहर परिसरातील सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला. चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे सदर जुगार अड्डा बेकायदेशीररित्या सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी टाकली असता येथे जुगार अड्डा सुरू असल्याचे निदर्शनास आले .विजय बळवंत माने (रा. विजयनगर हिंडलगा), इरषाद मुगुटसाब मजगाव (लक्ष्मीनगर काकती), समीर मुस्तफा पाशा (वडगाव विष्णू गल्ली), आशीफ आब्बास अली बागवान (लक्ष्मीनगर काकती), रमेश यलाप्पा चौगुले (खादरवाडी) व विश्वनाथ वरपे (विजयनगर हिंडलगा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर साहित्य मिळून २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शिनोळी फाटा ते शिनोळी खुर्द गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कॉम्प्लेक्समध्ये बालाजी ऑनलाईन लॉटरी या नावाने बिगरपरवाना हा व्यवसाय सुरू होता. या प्रकरणातील संशयित विजय बळवंत माने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जागा मालक विश्वनाथ वरपे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सिरसंगी येथे नवविवाहितेची आत्महत्या…नामदार मुश्रीफ यांच्यावरील चराटी यांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’….. ना. मुश्रीफ समर्थक कारखाना संचालकांचा पत्रकार बैठकीत आरोप

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!