mrityunjaymahanews
अन्य

गुरुवार – सातच्या बातम्या

गुरूवार 

२५ जून २०२६

हत्तीकडून ट्रॅक्टर पलटी
जेसीबीला धडक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पोळगाव व एरंडोळ येथे गेले तीन दिवस हत्तीने धुमाकूळ घातला असून बुधवारी पहाटे हत्तीने संभाजी बाळू नार्वेकर या पोळगाव येथील शेतकऱ्याच्या रहात्या घराजवळ उभा केलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी केली तर जवळच उभ्या असणाऱ्या जेसीबीला जोरदार धडक देऊन जेसीबीच्या काचाही फोडून टाकल्या आहेत .

गेले तीन दिवस हत्तीचा या भागातील शेती पिकामध्ये धुमाकूळ चालू आहे. येथील राजू होलम, दशरथ होलम यांच्या गट नंबर ११८ मधील ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. त्याचबरोबर भीमराव विठोबा चौगुले यांच्या उसाचेही नुकसान केले आहे.

बळीराजा खरिपाच्या तयारीत असतानाच हत्तीने जोरदार धुमाकूळ घातल्याने शेतीकामाकरीता शेताकडे जायची की नाही ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

कीर्तन व प्रवचनकार ह.भ.प.तानाजी पाटील यांना पुरस्कार जाहीर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोरीवडे ता. आजरा कीर्तन व प्रवचनकार ह.भ.प.तानाजी पांडुरंग पाटील यांना अविष्कार फाऊंडेशन इंडिया कोल्हापूर यांच्यावतीने त्यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२६ प्राप्त झाला आहे .

ह.भ.प.तानाजी पाटील हे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कीर्तन व प्रवचनकार असून आतापर्यंत त्यांनी १५ वर्षे पंढरपूरला महिनावारी केली आहे.तर २५ वर्षे आषाढी पालखी सोहळा पूर्ण केला आहे.पंढरपूर ते आळंदी कार्तिक पायी वारी २५ वर्षे तर आळंदी ते पंढरपूर आषाढी कार्तिक वारी २५ वर्षे पूर्ण केली आहे.तर २२ वर्षे कीर्तन व प्रवचन सेवा केली असून सुमारे ३ वर्षे श्री गुरु गोविंद कोंडकर आजरेकर फड प्रमुख यांचे त्यांना श्रवण घडले.

तोडलेल्या झाडांचे उत्तरदायित्व निश्चित करावे

वृक्षप्रेमींची कार्यवाहीची मागणी: कोल्हापुरात उपवनसंरक्षकांबरोबर चर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

चंदगड – हलकर्णी रस्ता व संकेश्वर- बांदा रस्ता रुंदीकरणात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. पण या बदल्यात करण्यात आलेली वृक्षलागवड असमाधानकारक आहे. रस्त्यासाठी तोडलेल्या झाडांचे उत्तरदायित्व निश्चित करावे व याबाबत कार्यवाही करावी. अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे. याबाबतत जिल्हा उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्याशी चर्चा केली.

वृक्षप्रेमी समूहाच्या सदस्या पुष्पलता घोळसे, डॉ. गौरी भोसले आणि मीना शिरगुप्पे या अपिलिय अर्जाच्या सुनावणीसाठी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे गेले असता कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांची भेट घेतली आणि वनविभागाशी संबंधित विविध मुद्द्द्यांवर चर्चा केली. चंडगड- वाटंगी फाटा, चितळे धनगरवाडा ते जिल्हा हद्द वृक्ष लागवड व संकेश्वर-बांदा रस्ता रुंदीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. मात्र, त्या बदल्यात झालेली वृक्ष लागवड अत्यंत असमाधानकारक असल्याचे वृक्षप्रेमींनी सांगीतले व तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्याचे काम करणाऱ्या कंपन्यांकडून जी वृक्ष लागवड केली जाते, त्यावर प्रत्यक्ष देखरेख कोणाची असते? तसेच या लागवडीचे ऑडिटची मुख्य जबाबदारी कोणाची आहे? य प्रक्रियेत उत्तरदायित्व निश्चित करून ठोस पावले उचलण्याची मागणी केली. उपवनसंरक्षक श्री. पाटील यांनी संपूर्ण प्रकरणात कायदेशीर व पर्यावरणपूरक मार्ग योग्य ती कार्यवाहीची ग्वाही दिली. आजरा परिसरातील वृक्षतोडीवर विशेष लक्ष देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले असल्याचे वृक्षप्रेमी सदस्यांनी सांगीतले.

आजरा बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा…

युवासेनेची मागणी 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा बसस्थानक व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आजरा आगार व्यवस्थापकांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, आजरा स्थानक व परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. आठवडीबाजार व गर्दीच्या काळात येथे चोरीचे प्रकार घडले आहे. चार पाच दिवसांपूर्वी येथे एका महीलेचे एसटी चढतांना सोन्याची पाटली चोरांनी कट करून पळवली. संबंधीत महीलेचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याने याचा तपास अदयाप लागलेला नाही. या चार दिवसात सीसीटीव्ही कॅमेरे बसस्थानक परिसरात बसवावेत. अन्यथा शंखध्वनी आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला आहे. निवेदनावर युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, युवासेना तालुका प्रमुख सूयश पाटील, बिलाल लतीफ, युवासेना उपतालुका प्रमुख अमित गुरव, महेश भोसले, शहरप्रमुख रोहन गिरी यांच्या सह्या आहेत.

निधन वार्ता
सौ.प्रभावती देसाई


देवकांडगाव तालुका आजरा येथील सौ . प्रभावती भगवानराव देसाई वय ( वय ७४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती भगवानराव देसाई , एक मुलगा,सूना, दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.बारावे २ जुलै २०२६ रोजी आहे.

तुळसाबाई पाटील

लाटगाव ता. आजरा येथील तुळसाबाई मारुती पाटील ( वय ७५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना कार्यकर्ते गणपती पाटील यांच्या त्या आई होत.

दाभिल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुगंधा राणे बिनविरोध


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

दाभिल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुगंधा पांडूरंग राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच युवराज पाटील होते. माजी उपसरपंच श्रावण वाजे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या पदावर राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.

आजचे पंचांग 

आजचे पंचांग
दिनांक : २५ जून २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : एकादशी (रात्री 08:09 पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : स्वाती नक्षत्र (सायंकाळी ०४.२८ पर्यंत) त्यानंतर विशाखा नक्षत्र
योग : शिवा योग (सकाळी १०.५३ पर्यंत) त्यानंतर सिद्ध योग
करण : वाणीजा करण (सकाळी ०७.०८ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : तुळ राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.२० ते दुपारी ०३.५९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१५ ते दुपारी ०१.०८
सूर्योदय : सकाळी ०६.०४
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

वर्गणी काढून पैसे देतो परंतु व्हीक्टोरिया पुलावरील खड्डे तातडीने मुजवा….आजऱ्यात मनसेचे रास्ता रोको.. हाजगोळी बुद्रुक येथे केला हत्तीने लॉंग केला…आजरा साखर कारखान्यावर वसंत भोसले यांचे व्याख्यान

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कुणी म्हणते बाल हनुमान, तर कुणी मारते दगड…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!