mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार  दि. ४ मार्च २०२६

शिरसंगीत हत्तीने रोड रोलरची केली दुर्दशा


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उभ्या रोड रोलरला दहा फूट फरफटत नेत हत्तीने रोड रोलरच्या केबिन ची मोडतोड केली आहे. तसेच वसंत देवळे यांच्या केळी व ऊस पिकाचे नुकसान केले आहे.

शिरसंगी येथे गोठणदेव ते काळवाट शेत रस्त्याची खडीकरणावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम कानोलीचे भोसले हे ठेकेदार काम करत असून त्यांचे रोड रोलर चे मशीन हे काम संपल्यानंतर रस्त्याच्या बाजूला उभी केली असता. रविवारी रात्री हत्तीने सदर मशीनच्या केबिनची मोडतोड करून सुमारे दहा फूट सदर मशीन फरफटत पुढे नेली. सुदैवाने मातीचा ढिगारा लागल्याने रोड रोलर त्याच ठिकाणी थांबून राहिला. हत्तीच्या या आक्रमकतेने शेतकऱ्यांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्तीने यानंतर सी.आर.देसाई यांच्या काजूच्या झाडांची मोडतोड केली त्याचबरोबर वसंत देवळे यांच्या केळीचे झाडांचे नासधूस करून जंगलाच्या दिशेने निघून गेला.

शनिवारी रात्री दत्तात्रय गुरव व विजय देसाई यांच्या पाणी सोडलेल्या ऊस खोडव्यात चक्क लोळण घेत दहा गुंठे शिवाराचे चिखल मैदान करून टाकले आहे. शिरसंगी वाटंगी रस्त्यादरम्यान असलेल्या दिशादर्शक फलकाची मोडतोड करून सदर फलक हा रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता. यामुळे हत्ती कडून शेतकऱ्यांसह सार्वजनिक मालमत्तेंचे हे नुकसान होत असून. वन विभागाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

इंदिरानगरात परसबागेत साळींदर…? नागरिकांत भीती.


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर (ता. आजरा) येथील इंदिरानगर परिसरातील कृष्णा कुंभार यांच्या परसबागेत साळींदर आढळल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून हे साळींदर वारंवार परसबागेत दिसत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

कांही दिवसांपूर्वी सायंकाळच्या वेळी झुडपांमध्ये हालचाल दिसल्याने नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता काटेरी अंगामुळे तो साळींदर असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अशोक पाटील, उत्तम बरडे, तुकाराम येजरे, आनंदा अस्वले, संदेश यमगेकर, महेश येजरे, विशाल बरडे, देवदत्त काळगे, अवधूत येजरे, विक्रम पोवार, विनायक बोरवडकर, विजय जाधव, प्रथमेश बरडे, प्रवीण यमगेकर या तरुणांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, साळींदर हा संरक्षित वन्यप्राणी असून तो सहसा माणसांवर हल्ला करत नाही. स्वतःच्या बचावासाठी तो अंगावरील काटे उभे करतो. वाढते शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

माव्यासह प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मावा, गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असलेल्या संभाजी चौक येथील एका पान शॉपवर टाकलेल्या धाडीत सुमारे २२ हजार ४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​​याप्रकरणी पोलिसांनी मुजाहिद मुबारक काकतीकर (वय २४ वर्षे, रा. भारतनगर, आजरा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


यश फौंडेशनच्या पेरणोली कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

यश फौंडेशन पेरणोली तर्फे तुकाराम बीज निमित्त आयोजित करण्यात आलेली कबड्डी स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत विविध भागांतील संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत बेळगुंदी अ संघाने प्रथम क्रमांक, पेरणोली संघाने द्वितीय क्रमांक. बेळगुंदी ब संघाने तृतीय,  तर सुलगाव संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, चपळाई आणि संघभावना दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली.स्पर्धेचे उद्घाटन जयवंत मसनू सुतार यांच्या हस्ते करण्यात आले.

अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चुरशीची लढत देत प्रेक्षकांना थरार अनुभवायला लावला. विजेत्या संघाला ट्रॉफी, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेत्या संघालाही पारितोषिक देण्यात आले.

यावेळी आयोजकांनी सांगितले की, ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि कबड्डीसारख्या पारंपरिक खेळाला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.याच कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीच भान राखत फौडेशन संस्थापक संतोष जाधव यांनी गावातील आकस्मित मृत्यू झालेल्या कै‌ उदय सावंत यांच्या परिवाराला रोख रक्कम दहा हजार देऊन फौंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली. सेवानिवृत्ती निमित्त रवींद्र देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

स्पर्धेमुळे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 

फर्नांडिस दांपत्याचा अवयवदानाचा कौतुकास्पद निर्णय


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील प्राथमिक शिक्षक मायकेल फर्नांडिस व रामतीर्थ न्युट्रिशन सेंटरच्या चालक सौ.अनिता फर्नांडिस या दांपत्याने आपल्या शरीराचे मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

समाजकार्य करण्यात नेहमीच अग्रभागी असणाऱ्या या दांपत्याने मरणोत्तर आपल्या शरीराचे अवयव इतर गरजूंना उपयोगी पडावेत असा विचार करून या घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद व अनुकरणीय आहे.

तालुका जनआरोग्य हक्क समितीची आज जनता बँक येथे बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आपले आरोग्य आपला अधिकार तसेच सरकारी व खाजगी आरोग्य सेवा समजून घेण्याकरीता आजरा येथील जनता बँक सभागृहात आज बुधवार दिनांक ४ मार्च रोजी दुपारी २ वा. अत्यावश्यक आरोग्य सेवांची माहिती आणि कृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खाजगी दवाखान्यात गेल्यावर अँडमीट झालेनंतर भरमसाठ बील घेतले जाते. अनावश्यक टेस्ट व आजार एक आणी उपचार वेगळे केले जातात अशावेळी काय करावे, हे आपल्याला माहित आसने गरजेचे आहे. हे समजावून घेणेसाठी केंद्रशासन आणि महाराष्ट्र शासनान २०२१ जीआर MNHRA अधिनीयम नुसार प्रत्येक खाजगी व सरकारी दवाखाण्यात रुग्णांच्या हक्कासाठी सर्व दवाखान्यात रुग्ण हक्कांची सनद, दर फलक, तक्रार निवारण व सुचना पेटी किंवा तक्रारनिवारण हेल्पलाईन नंबर हे लावलेच पाहिजे, हे माहीत नसलेने खाजगी व सरकारी दवाखान्यात जनतेला सेवा घेताना खुप त्रास सहन करावा लागत आहे व आर्थिक लुट वाढत आहे. या कार्यक्रमासाठी जन आरोग्य हक्क समिती कोल्हापूर व जन आरोग्य हक्क अभियान महाराष्ट्र चे प्रतिनीधी येत आहेत. तरी सर्वांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन काशिनाथ मोरे जन आरोग्य समिती आजरा यांनी केले आहे.

आजचे पंचांग

♦ दिनांक : ४ मार्च २०२६
♦ वार : बुधवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : चैत्र
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : कृष्ण पक्ष
♦ तिथी : प्रथम तिथी (सायंकाळी ०४.४८ पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
♦ नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (सकाळी ०७.३८ पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
♦ योग : धृति योग (सकाळी ०८.५१ पर्यंत) त्यानंतर शूल योग
♦ करण : कौलव करण (सायंकाळी ०४.४८ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
♦ चंद्र राशी : सिंह राशी (दुपारी ०१.४५पर्यंत) त्यानंतर कन्या राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.५० ते दुपारी ०२.१९ पर्यंत
♦ सूर्योदय : सकाळी ०६.५७
♦ सूर्यास्त : सायंकाळी ०६.४४
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
♦ शक संवत: १९४७ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!