mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या…


अन्यथा नगरपंचायतीसमोर आंदोलन…

                    आजरा: प्रतिनिधी

        अपंग आणि दिव्यांग बांधवांच्या मागण्यांच्या बाबतीत नगरपंचायतीने गांभीर्यपूर्वक लक्ष नाही दिले तर येत्या २० दिवसात आजरा नगरपंचायत कार्यालयासमोर मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

        याबाबत निवेदनाद्वारे संघटनेने केलेल्या मागण्या…

      आजरा ग्रामपंचायतीतील (आजरा नगरपंचायत स्थापनेअगोदर) सन २००९-१० ते सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील दिव्यांग / अपंग कल्याणनिधी शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधीत लाभार्थ्यांना वाटप न झालेला निधी ताबडतोब वाटप केला पाहिजे. 

      आजरा नगरपंचायत स्थापन झालेनंतर सन २०१८-१९ व २०२४-२४ या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार तरतूद करण्यात आलेला ५ % राखीव निधी त्याचा ताबडतोब अनुशेषासह परिपूर्ण विनीयोग झालाच पाहिजे.

      गटविकास अधिकारी पंचायत यांनी दिलेल्या पत्रानुसार राहिलेला अनुशेष आजरा ग्रामपंचायतीतील (आजरा नगरपंचायत स्थापने अगोदर) सन २००९/१० ते सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील दिव्यांग/अपंग कल्याणनिधी शासन निर्णयानुसार सर्व संबधित लाभार्थ्यांना वाटप न झालेला निधी ताबडतोब वाटप करण्यात यावा.

      यापूर्वी ग्रामपंचायतीने रक्कम रू.४३६२०/- इतकी खर्च केलेला असून अनुशेष रक्कम रू.७५९३३८/- इतकी खर्च करणेचे असलेचे दिसून येते. आजरा ग्रामपंचायतीला दि.१२/०९/२०१७ नंतर नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडील यापूर्वीचे सर्व अभिलेखे नगरपंचायतीकडे हस्तांतर करणेत आलेले आहेत. त्यामुळे यावर पंचायत समिती आजरा यांनी योग्य ती कार्यवाही करावी .  

     घरफाळयामध्ये ५० टक्के सवलत दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाला नगरपंचायतींने दिली पाहिजे.

यासह विविध मागण्या करण्यात आल्या असून या मागण्यांच्या बाबतीत नगरपंचायतीने गांभीर्यपूर्वक लक्ष नाही दिले तर येत्या २० दिवसात आजरा नगरपंचायती कार्यालयासमोर मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

     यावेळी संग्राम सावंत राज्याध्यक्ष- मुक्ती संघर्ष समिती रूजाय डिसोझा,अबु माणगावकर, आलीया कानडीकर, जगदीश करूणकर, गौस माणगावकर,मारूती गोंधळी,रामचंद्र डोंगरे,आबुहुसेन माणगावकर,अशोक हरेर,अलका नेवरेकर व इतर सर्व अपंग द्विव्यांग बांधव उपस्थित होते.


अखेर रामतीर्थ रस्ता डांबरीकरणाला मुहुर्त मिळाला…


                   आजरा : प्रतिनिधी

        महिनाभरापूर्वी खडीकरण करून अर्धवट अवस्थेत पडलेल्या रामतीर्थ मार्गावरील रस्त्याबाबत स्थानिक अन्याय निवारण समिती व मृत्युंजय महान्यूजने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त मिळाला असून डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

        महिनाभरापूर्वी सदर रस्त्याचे खडीकरण पूर्ण झाले होते. परंतु सर्वत्र खडीचे साम्राज्य झाल्याने या मार्गावर ये-जा करणाऱ्या दुचाकी स्वारांची चांगलीच अडचण होत होती. वाहने घसरून पडण्याचे प्रमाणही वाढले होते. गेल्या आठवड्याभरापासून स्थानिक अन्याय निवारण समिती व मृत्युंजय महान्यूज ने संबंधित ठेकेदार व पंचायत समिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे रस्त्याबाबत पाठपुरावा सुरू केला होता.

      अखेर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामुळे रामतीर्थ परिसरात भेट देणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


रस्सीखेच स्पर्धा जिंका… बोकड आणि कोंबड्या घेऊन जा…

                   आजरा:प्रतिनिधी

       हात्तिवडे ता. आजरा येथे विजय बजरंग व्यायाम शाळेच्या वतीने खुल्या रस्सीखेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांकाच्या विजेत्यांना बोकड व कोंबड्यांचे बक्षीस ठेवले आहे. आता या  स्पर्धेत कोण विजयी होणार आणि बोकड आणि कोंबड्यांवर ताव मारण्याची संधी कोणाला मिळणार? यावर चर्चा सुरू झाली आहे.

        २० फेब्रुवारी रोजी हात्तिवडे येथे या स्पर्धा होत असून प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी एक पालवा तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना ७ कोंबडे, चतुर्थ क्रमांकाचे विजेत्याला ४ कोंबडे व पाचव्या क्रमांकाला दोन कोंबडे असे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

       बक्षीसांचे स्वरूप बघून अनेकांनी आता स्पर्धेत उतरण्याच्या दृष्टीने जोर बैठका सुरू केलेल्या आहेत.


 

कर्पेवाडीत शैक्षणिक साहित्याचे वाटप…
डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम

                   उत्तूर : प्रतिनिधी

       कर्पेवाडी ता. आजरा येथे डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट उत्तूरच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी विठ्ठल कदम उपस्थित होते.

      अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्ष पूनम अस्वले, डॉ. सचिन पोवार, विद्या पोवार यांच्या हस्ते सदर साहित्याचे वाटप झाले. डॉ. पोवार यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी उपाध्यक्षा शीतल कुदळे, कल्पना भाइगडे, वनिता पाटील, राघवेंद्र पाटील, प्रीती कांबळे, ग्राम पंचायत सदस्या सुमन कदम व सोनाबाई कदम, साधना यादव यांच्यासह बहुसंख्येने पालक,नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रस्ताविक व स्वागत गणपती नागरपोळे यांनी केल.सूत्रसंचालन मुख्याध्यापिका वनिता पाटील यांनी केले तर आभार विद्या पोवार यांनी मानले.


आजऱ्यात गणेश जयंती उत्साहात

                    आजरा : प्रतिनिधी

       आजरा शहर व परिसरात ठिकठिकाणी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील रवळनाथ मंदिर, गणपत गल्ली येथील गणपती मंदिर यासह आजूबाजूच्या गावातील गणेश मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन,कीर्तन, महाप्रसाद, हातप्रसाद आरत्या, काकड आरत्या आदींचा समावेश होता.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

पोश्रातवाडी येथून वृद्ध बेपत्ता….

mrityunjay mahanews
error: Content is protected !!